मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट घातक ठरली. राज्य सरकारने ही लाट ओरसत असताना लॉगडाऊनचे नियम शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. पाच स्टेपमध्ये हे निर्बंध शिथिल केले जात आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा आलेख हा सातत्याने चढ-उताराचा दिसून येत आहे. 23 जून रोजी राज्यात उपचारादरम्यान 163 जणांचा मृत्यू झाला होता. तर हा आकडा वाढून 24 जूनला (गुरुवारी) 197 इतका झाला आहे. राज्यात एकूण कोरोना रुग्णांच्या मृतांची संख्या 1 लाख 19 हजार 859 इतकी आहे. तर राज्यातील मृत्यूदर 2 टक्क्यांवर आला आहे.
24 तासात 9 हजार 844 कोरोनाग्रस्तांची नोंद -
राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार राज्यात 24 तासात 9 हजार 844 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित त्यांची संख्या 60 लाख पार गेली आहे. राज्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 60 लाख 7 हजार 431 इतकी आहे. तर एकूण सक्रीय रुग्णांची संख्या 1 लाख 21 हजार 767 इतकी आहे. 24 तासात राज्यात 9 हजार 371 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 57 लाख 62 हजार 661 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे रिकव्हरी रेट 95.93 टक्के इतका झाला आहे.