ETV Bharat / city

Omicron, Hospitals Equipped With Oxygen : ओमायक्रॉनसाठी राज्यात सतर्कता,ऑक्सिजनसह रूग्णालये सज्ज,नव्या लसीवरही संशोधन

कोरोनाच्या ओमायक्राॅन ( Omicron) या नव्या विषाणूने जगभराची झोप उडवली आहे. देशातपण संशय असलेले रूग्ण (Suspicious patients) सापडू लागले आहेत. या निमीत्ताने तिसऱ्या लाटेची भीती (Fear of the third wave) व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील यंत्रणेचा आढावा घेतला असता सर्व प्रमुख शहरांत ऑक्सिजन बेड सह रूग्णालयांतील खाटांची संख्या वाढवण्यात आली आहे. तसेच नव्या लसीवरही (research on new vaccine) संशोधन सुरू असल्याचे समोर आले.

Omicron
ओमायक्राॅन
author img

By

Published : Dec 7, 2021, 5:15 PM IST

मुंबई : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. आता त्यांची रॅपिडपीसीआर चाचणी केली जाणार आहे. या चाचणीचा अहवाल लवकर येतो. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर विेशेष लक्ष दिले जात आहे. अशा प्रवाशांची सखोल तपासणी केली जाते. तसेच त्यांना ७ दिवस सक्तीचे होम क्वारंटाईन आहे.

लसीच्या परिणामावर संशोधन

पुणे - ओमायक्रॉनच्या विषाणूत 50 म्युटेशन झाले आहे.त्यातील 32 म्युटेशन हे स्पाईक प्रोटीनमध्ये आहे. यामुळे या विषाणूवर कोण्यात्याही अँटिबॉडीजचा परिणाम होत नाही. त्यामुळे आत्ताच्या लसीवर परिणाम होत नाही असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या लसींचा अभ्यास करत आहे. ओमायक्रॉनला रोखू शकेल अशी नवीन लस तयार करावी लागेल असे सांगितले जात आहे. संभाव्य धोक्याबाबत चर्चा होऊ लागल्यानंतर नागरिक पुन्हा लसीकरणाकडे वळल्याचे चित्र आहे

जिल्हा स्तरांवर कोविड केअर सेंटर.

नागपूर - ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे परत एकदा जिल्हा स्तरांवर कोविड केअर सेंटर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरातील आमदार निवासात कोविड केअर सेंटर पूर्ववत सुरू करण्यात आले आहे. बाधित रुग्णांसाठी १४० खोल्या तयार करण्यात आल्या आहेत, परिस्थिती बघून खोल्या आणखी वाढल्या जाणार आहेत. सध्या शहरातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर चाचणी केल्यावर रिपोर्ट येई पर्यत त्यांना आमदार निवसातील कोविड केअरमधे विलगीकरण कक्षात राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.

2200 ऑक्सिजन बेड सह 3300 खाटा
नाशिक - महानगरपालिकेने रुग्णालय,कोविड सेंटरमध्ये 3 हजार 300 खाटा सज्ज ठेवलल्या असून, त्यात 2 हजार 200 खाटांना ऑक्सिजनची सुविधा दिली आहे. तसेच प्रतिदिन 400 मेट्रिकटन ऑक्सिजन साठा उपलब्ध ठेवला आहे. खासगी रुग्णालयांमध्ये हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे 23 प्रकल्प उभारले आहेत.

कोल्हापूरात 500 बेडचे नियोजन

कोल्हापूर - जिल्ह्यात अनेक ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्याची तयारी असून सद्यस्थितीत केवळ 40 कोरोना रुग्ण असल्याने त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संभाव्य धोका ओळखून जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयासह प्रत्येक तालुक्यात एक कोविड सेंटर पुन्हा पावरली जाणार आहेत. प्रत्येक तालुक्‍यात एक अशा प्रमाणे जवळपास 500 बेड चे नियोजन ठेवण्यात आले आहे. कोरोनासाठी वापरण्यात आलेली सर्वच कोविड सेंटर आता ओमायक्रोनच्या रुग्णांवरील उपचारासाठी वापरण्यात येणार आहेत.

दुप्पट ऑक्सीजणची सोय
औरंगाबाद - कोरोनाच्या दोन्ही लाटेत काही प्रमाणात ऑक्सीजनचा तुटवडा जाणवला होता मात्र सध्या ११० मेट्रिक टन म्हणजे जवळपास दुप्पट ऑक्सीजनाची उपलब्धता आहे. पुर्वी अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला होता. यामुळे रुग्णांची गैरसोयही झाली होती. आता मात्र जिल्हा प्रशासनाने यंत्रणा सज्ज केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.