मुंबई - गेल्या काही दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन राज्यभर सुरू आहे. अजून देखील या आंदोलनाचा तिढा सुटलेला नाही. आज ( बुधवारी ) एसटी कर्मचारी मंत्रालय मंत्रालयासमोर आंदोलन करणार होते. हे आंदोलन होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांतर्फे मानखुर्द चेक पोस्ट येते एसटी कर्मचाऱ्यांना अडवले जात आहे. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनात उतरलेले सदाभाऊ खोत यांना देखील काढण्यात आले. अडवण्यात आल्यानंतर खोत यांनी रस्त्यावरच अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन राज्यात काही दिवसापासून एसटी कर्मचारी आंदोलन करत आहे. मात्र, मागण्या मान्य न झाल्याने एसटी कर्मचारी देखील आक्रमक झाले आहेत. आज एकत्रित मंत्रालयात वरती आंदोलन करण्याच्या तयारीत कर्मचारी आहेत. हे आंदोलन थांबावे व एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असे सरकारकडून वेळोवेळी आवाहन केले जात आहे. मात्र, एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने देखील कडक भूमिका घेत, राज्यभरातील ३७६ एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे या आंदोलनाला वेगळेच वळण लागले आहे. यामध्ये आता राजकीय पक्षाने देखील उडी घेतल्याने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसह मंत्रालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मुलाबाळांसह मंत्रालयाबाहेर आंदोलनाला बसतील असा इशारा पडळकरांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर कर्मचारी मुंबईत जमायला सुरुवात झाली आहे व यांना अडवण्यासाठी जागोजागी चेक पोस्ट लावण्यात आले आहे. शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांन सोबतच मानखुर्द जकात नाक्यावर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. सदाभाऊ खोत यांनी मानखुर्द जकात नाक्यावरच अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केलेली आहे.मंत्रालय येथे होणार आंदोलन
आज मुंबई मंत्रालय येथे होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास महाराष्ट्रातून अनेक एसटी कर्मचारी दाखल झाले आहे. परंतु मुंबईकडे येणाऱ्या रस्त्यांवर या महाविकास आघाडी सरकारने मानखुर्द चेकपोस्ट येथे पोलीस बंदोबस्त लावून एसटी कर्मचाऱ्यांना अडवले जात आहे. त्याचा आम्ही रस्त्यावर बसून निषेध केला व अन्नत्याग आंदोलनास सुरुवात केली असे शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी सांगितले.हेही वाचा - उनकी नींद खो गई है, अब चैन खोने का वक्त आ गया है'; नवाब मलिक यांचे सूचक ट्विट