ETV Bharat / city

एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळतोय; आज राज्यातील ११७ एसटी डेपो बंद! - एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळतोय

एसटी महामंडळ शासनात विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा संप दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. एसटी कर्मचारी आपल्या मागणीसाठी आक्रमक झाले असून राज्यभरातील आगार बंद पडण्याची संख्या सुद्धा वाढत जात आहे. संपामुळे शनिवारी एसटीचे तब्बल ६५ डेपाे बंद राहिले होते. तर आज दुपारपर्यंत राज्यातील एकूण ११७ डेपो या संपामुळे बंद पडले असून नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

ST workers strike
ST workers strike
author img

By

Published : Nov 7, 2021, 5:16 PM IST

मुंबई - एसटी महामंडळ शासनात विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा संप दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. एसटी कर्मचारी आपल्या मागणीसाठी आक्रमक झाले असून राज्यभरातील आगार बंद पडण्याची संख्या सुद्धा वाढत जात आहे. संपामुळे शनिवारी एसटीचे तब्बल ६५ डेपाे बंद राहिले होते. तर आज दुपारपर्यंत राज्यातील एकूण ११७ डेपो या संपामुळे बंद पडले असून नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

एसटी कर्मचारी संपाचा घटनाक्रम -

विविध मागण्यांसाठी एसटीतील २३ कामगार संघटनांची कृती समिती स्थापन केली आहे. कृती समितीने २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण सुरू केले. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्त्याची मागणी मान्य झाल्याने कृती समितीने २८ ऑक्टोबर रात्रीपासून उपाेषण मागे घेतले. परंतु विलिनीकरणाच्या मुद्यावर कर्मचाऱ्यांंनी संप सुरुच ठेवला आहे. कृती समितीतील २३ कामगार संघटनांनी विलिनीकरणाच्या मागणीला पाठिंबा दिला असला तरी २२ संघटना संपात सहभागी झालेल्या नाहीत. संघर्ष एसटी कामगार संघटना आणि महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटना यांनी ३ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून संप पुकारण्याची नोटीस दिली. संपामुळे दिवाळीच्या सुट्टीत महामंडळाच्या सेवेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी महामंडळाने या नोटिसीविरोधात उच्च न्यायालयात बुधवारी आव्हान दिले. या याचिकेवर गुरुवारी रात्री सुनावणी झाली असता संघटनांनी संप मागे घेण्याचे निर्देश न्यायालयाने कामगार संघटनांना दिले आहे. तरी सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत संप सुरुच ठेवला आहे.

राज्यातील हे बस आगार बंद -

पैठण, बीड, पाटोदा, गेवराई, परळी, आंबेजोगाई, आष्टी, माजलगाव, धारूर, उदगीर, निलंगा, औसा, किनवट, भोकर, माहूर, कंधार, नांदेड, हादगांव, मुखेड, देगलूर, बिलाेली, हिंगोली, गंगाखेड, वसमत, जिंतूर, पाथरी, तिरोंडा, तुमसर, गोंदिया, पवणी, साकोली, गडचिरोली, चंद्रपूर, राजुरा, चिमुर, वरोरा, वर्धा, हिंगणघाट, आर्वी, तळेगाव, आटपाडी, शिराळा, इस्लामपूर, जामखेड, श्रीगाेंदा, नेवासा, कळवण, रिसाेड, मंगळूरपीर, परतवाडा, बडनेरा, चिखली, मेहकर, उमरखेड, पुसद, दिग्रस आदी आगार बंद होते. मात्र आज दुपारपर्यंत राज्य परिवहन महामंडळातील राज्यातील एकूण 250 आगारांपैकी आज ११७ आगार संपामुळे बंद पडलेली आहेत.

हे ही वाचा - उडता पंजाब, प्रमाणे 'उडता महाराष्ट्र' करण्याचा प्रयत्न; नवाब मलिकांचे समीर वानखेडेवर आरोप

एसटी कर्मचाऱ्यांचा संपात राजकीय नेत्यांची उडी -

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण, वेतन व इतर मुद्यांवरून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी, कामगारांनी सुरू केलेल्या आंदोलनात आता भाजपाने उडी घेतली आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसह मंत्रालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संपात सहभागी असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर आणि आंदोलनकर्त्यावर गुन्हे नोंदवू नयेत अशी मागणी केली आहे.

प्रकाश आंबेडकरांचा संपाला पाठिंबा -

एसटी महामंडळ कामगारांनी पुकारलेल्या संपाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे. अनेक वर्षांपासून कामगारांच्या मागण्या रखडलेल्या आहेत. प्रत्येक वेळी एसटी तोट्यात असल्याचे सांगितले जाते, परंतु महामंडळाच्या बसेस पूर्ण भरून चालतात. त्यामुळे एसटी महामंडळ तोट्यात आहे हे मान्य होण्यासारखं नाही. ते नफ्यातच असले पाहिजे असे आम्ही गृहीत धरतो. महाराष्ट्र शासनाने कामगारांशी बोलून त्यांचा प्रश्न तात्काळ सोडवावा व मागण्या मान्य कराव्या, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.