मुंबई - गेल्या सव्वा दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलगीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन ( ST Worker Strike ) सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर येण्याचे आवाहन करुन देखील कर्मचारी कामावर येत नाहीत. त्यामुळे महामंडळाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. सोमवारी 304 निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात ( MSRTC Dismissed 304 Employees ) आले. आतापर्यंत ३ हजार ८६२ कर्मचाऱ्यांना बडतर्फ ( MSRTC Dismissed 3862 Employees ) केले आहे. तर ६ हजार २९ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा ( MSRTC Issue Dismissed Notice Employees ) नोटीस बजावली आहे.
३ हजार ८६२ बडतर्फ
एसटी संप सुरु असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या २२ संघटनांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar Meeting St Worker ) आणि परिवहन मंत्री अनिल परब ( Anil Parab Meeting St Worker Strike ) यांनी चर्चा केली. बैठकीनंतर एसटी कृती समितीच्या सदस्यांनी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजु होण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, कर्मचारी संपावर ठाम असल्याने महामंडळाची कारवाई सुरु केली आहे. सोमवारी ३०४ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. ३८६२ कर्मचाऱ्यांना आजतागायत बडतर्फ केले आहे. तर ११०२४ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच, ६०२९ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
६६ हजार पेक्षा जास्त कर्मचारी संपात
एसटी महांडळातील ९२ हजार कर्मचाऱ्यांपैकी फक्त २६ हजार ६१९ कर्मचारी कामावर हजर झाले आहे. उर्वरित ६३ हजार पेक्षा जास्त कर्मचारी संपात सामील आहे. तसेच, २५० आगारांपैकी २२६ सुरु झाले असून, २४ आगार अद्यापही बंद आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा फटका महामंडळाला बसत आहे. त्याशिवाय नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
हेही वाचा - Dhanush Aishwaryaa Rajinikanth Separated : 'थलाईवा’ रजनीकांतचा जावई धनुष आणि ऐश्वर्याचा घटस्फोट