ETV Bharat / city

ST Worker Strike : एसटी संपाचे भिजत घोंगडे; 563 एसटी कर्मचारी बडतर्फ, आतापर्यंत 10 हजार कर्मचारी निलंबीत - एसटी महामंडळ कर्मचारी संप

मागील दोन महिन्यांच्या अधिक कालावधीपासून राज्यात एसटी संप ( ST Worker Strike ) सुरू आहे. या संपात सहभागी झालेल्या 563 कर्मचाऱ्यांना बडतर्फ ( St Worker Suspension ) केले आहे. तर 10 हजार 731 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

ST Worker Strike
एसटी महामंडळ संप
author img

By

Published : Dec 29, 2021, 10:58 AM IST

मुंबई : एसटी महामंडळाकडून निलंबीत कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा सुरुच आहे. मंगळवारी महामंडळाने 148 निलंबित कर्मचाऱ्यांनी बडतर्फ केले (St Action On Employees). यामुळे बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या 563 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 10 हजार 731 कर्मचाऱ्यांचे निलंबन केले असून, त्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

68 हजार 340 कर्मचारी संपात सहभागी

गेल्या दोन महिन्यांच्या एसटी महामंडळ विलगीकरणाच्या मागणीवरुन कर्मचारी संपावर आहेत ( ST Worker Strike ). त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. राज्यात 92 हजार कर्मचाऱ्यांपैकी 23 हजार 660 कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आहेत. आतापर्यंत राेजंदारीवरील अडीच हजार कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली असून, 10 हजार 731 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. त्याशिवाय 2 हजार 796 कर्मचाऱ्यांचा बदल्या केल्या आहे. 68 हजार 340 कर्मचारी अद्यापही प्रत्यक्षात संपात सहभागी असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.

92 आगारातील एसटीची चाके बंदच

एसटी महामंडळाने सांगितल्यानूसार, राज्यातील 250 आगारापैकी 158 आगार सुरु झाले आहेत. तर 92 आगार संपामुळे अजूनही बंद आहे. त्यात औरंगाबाद विभागातील 18 आगार, मुंबई विभागातील 15, नागपूर विभागातील 11, पुणे विभागातील 7, नाशिक विभागातील 22 आणि अमरावती विभागातील 19 आगार असे 92 आगाराचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.