मुंबई - गेल्या पाच महिन्यांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन ( ST Worker Strike ) करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संयमाचा बांध आज तुटला. सरकारने आणि न्यायालयाने एसटीचे विलीनीकरण शक्य नाही, हे सांगितल्यानंतर आपल्या मागणीवर ठाम असलेल्या आणि संयम सुटलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज शरद पवार यांच्या निवासस्थानी ( ST Worker Agitation At Sharad Pawar House ) जोरदार धडक दिली. 'शरद पवार मुर्दाबाद अजित पवार मुर्दाबाद' अशा घोषणा देत या आंदोलकांनी आपला राग व्यक्त केला आहे.
एसटीच्या विलीनीकरणाला पवारांचा अडथळा - एसटीच्या विलीनीकरणात अडथळा आणण्यात सर्वस्वी शरद पवारच जबाबदार आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाले आहेत. त्यामुळे शरद पवार यांचा निषेध करत त्यांच्या घराच्या दिशेने चपला आणि दगडफेक करीत आंदोलन सुरू झाले. आंदोलक त्यांच्या घरासमोर ठाण मांडून बसले आहेत. आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर शरद पवार यांच्या घरातही घुसू, असा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, एसटी कर्मचारी आक्रमक झाल्यानंतर आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरासमोरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
काय म्हणाले गृहमंत्री? - एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( ST Worker Agitation At Silver Oak ) यांच्या मुंबईतील घरावर हल्ला केल्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Dilip Walse Patil PC After Silver Oak Attack ) यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. तसेच न्यायालयाने निर्णयाचे स्वागत केल्यानंतर असा हल्ला होणं म्हणजे कोणीतरी एसटी कर्मचाऱ्यांना ( Dilip Walse Patil Reaction ST Worker Agitation ) भडकवण्याचे काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.
-
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आज अचानक जे अनिष्ट वळण लागले ते अनुचित आहे.
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) April 8, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेबांच्या मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर झालेली निदर्शने अस्थानी व अनाठायी आहेत. कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावणारे कोण हे सर्वश्रुत आहे. @PawarSpeaks
">एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आज अचानक जे अनिष्ट वळण लागले ते अनुचित आहे.
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) April 8, 2022
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेबांच्या मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर झालेली निदर्शने अस्थानी व अनाठायी आहेत. कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावणारे कोण हे सर्वश्रुत आहे. @PawarSpeaksएसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आज अचानक जे अनिष्ट वळण लागले ते अनुचित आहे.
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) April 8, 2022
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेबांच्या मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर झालेली निदर्शने अस्थानी व अनाठायी आहेत. कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावणारे कोण हे सर्वश्रुत आहे. @PawarSpeaks
शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला अतिशय दुर्देवी आहे. ही निश्चितच काळजी वाटावी, अशी घटना आहे. हल्ला झाला त्यावेळी महिला आंदोलक अधिक असल्याने पोलिसांना त्यांना अडवता आले नाही. आम्ही सकाळ पासून क्राईम कॉन्फरन्समध्ये व्यस्त होतो. त्यमुळे फेल्युअर कुठे झाले, हे शोधून काढू. तसेच आयबी (IB) ला याबाबत कसे कळले नाही, याची माहिती घेऊ, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले. पुढे बोलताना ते म्हणाले, एस टी कामगारांच्या प्रश्नांच्या अडून काही राजकीय शक्ती हे घडवत आहेत. हे आंदोलक कोण होते. खरेच आंदोलक होते का, हे तपासातून समोर येईलच. ज्या चुका झाल्यात त्या तपासल्या जातील, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी एस टी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे, असे आवाहनही केले.
हेही वाचा - Power Crisis In State : राज्यात लोडशेडिंग होणार नाही याची काळजी घेऊ - नितीन राऊत