मुंबई - एकीकडे एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा, या प्रमुख मागणीसाठी गेल्या १८ दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर गेले आहे. मात्र, दुसरीकडे गेल्या तीन दिवसांपासून संपात फूट पाडण्यात आता राज्य सरकारला यश येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कालपेक्षा आज राज्यभरात एसटी कर्मचारी कर्तव्यावर हजर होणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे. आज दिवसभरात १ हजार ३१७ प्रवाशांनी एसटीतून प्रवास केला आहे.
सहा हजारापेक्षा जास्त कर्मचारी कर्तव्यावर हजर -
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाविरोधात एसटी महामंडळाने उच्च न्यायालय आणि औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने सुद्धा संप करण्यास नकार दिला होता. तरी सुद्धा कर्मचाऱ्यांनी संपावर गेले आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नयेत, म्हणून राज्यातील खाजगी बस संघटनाना राज्यातील विविध स्टँडवरून खासगी बस गाड्या सोडण्याची परवानगी दिली आहे. याचबरोबर कामावर येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण दिल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून कामावर येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी १ हजार ५०० शनिवारी ३ हजार, रविवारी ३ हजार९८७ आणि आज ६ हजार ८९५ कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आहे. तर प्रत्यक्षात ८५ हजार ३७१ कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.
आज लालपूरीतून १,३१७ प्रवाशांनी केला प्रवास -
एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे, मागणीसाठी सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या संपामुळे एसटीच्या राज्यभरातील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान संपात फूट पडली असून शुक्रवारपासून तुरळक प्रमाणात एसटी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यभरातून १५ मार्गावर, शिवनेरी, शिवशाही आणि साध्या अशा एकूण ५१ बसेस धावल्या आहेत. या बसेसमधून १ हजार ३१७ प्रवाशांनी प्रवास केला आहे. विशेष म्हणजे आज सुटलेल्या बसेसपैकी सर्वाधिक बसेस लांब पल्ल्याच्या बसेस होत्या. ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आज एसटी कर्मचारी उपस्थिती -
- प्रशासकीय कर्मचारी - ९ हजार ४२६ पैकी आज ५ हजार १८७ कर्मचारी हजर.
- कार्यशाळा कर्मचारी १७ हजार ५६० पैकी आज १ हजार ४१५ कर्मचारी हजर.
- एसटी चालक ३७ हजार २२५ पैकी आज १९७ कर्मचारी हजर.
- एसटी वाहक २८ हजार ५५ पैकी आज ९६ कर्मचारी हजर.
ST Employees Strike : आज सहा हजाराहून अधिक एसटी कर्मचारी कामावर हजर, १ ३१७ प्रवाशांचा लालपूरीतून प्रवास - एसटी संप महाराष्ट्र
गेल्या १८ दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर गेले आहे. मात्र, दुसरीकडे गेल्या तीन दिवसांपासून संपात फूट पाडण्यात आता राज्य सरकारला यश येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कालपेक्षा आज राज्यभरात एसटी कर्मचारी कर्तव्यावर हजर होणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे. आज दिवसभरात १ हजार ३१७ प्रवाशांनी एसटीतून प्रवास केला आहे.