मुंबई - गृहमंत्र्यांच्या घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू ( ST Employees agitation next to home minister house ) आहे. एसटी कर्मचाराी हे दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात एसटी कामगारांची घोषणाबाजी सुरू आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात बोलत आमच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांकडून सरकारचा जाहीर निषेध केला जात आहे असे कामगारांनी सांगितले आहे. पोलिसांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या बंगल्यावर जाण्यापूर्वीच एस. टी. कामगार आंदोलनाची अडवणूक केली आहे तर काही एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गृहमंत्र्यांच्या घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन -
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी आज आंदोलन करत गृहमंत्र्यांचा निषेध केला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे वकील एडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. जवळपास पन्नास ते साठ एसटी कर्मचाऱ्यांनी गृहमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांना अडवून त्यांना ताब्यात घेतल आहे.
22 मार्चला विलीनीकरण बाबत अधिवेशनात होणार निर्णय! -
गेल्या आठ महिन्यापासून एसटी कर्मचारी एसटी महामंडळाचा शासनामध्ये विलीनीकरणाच्या मुख्य मागणीसह अन्य काही मागण्या घेऊन आंदोलन करत आहे. एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाबाबतचा त्रिसदस्य अहवाल देखील अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात आला असून विलीनीकरण शक्य नसल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. मात्र विलीनीकरणाच्या मुद्द्यावर अधिवेशनात 22 मार्चला निर्णय घेतला जाईल अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी सदनात दिली आहे. तसेच 22 मार्चला एसटी कर्मचाऱ्यांचा समोर राज्य शासनाकडून विलीनीकरण याबाबत पर्याय ठेवला जाईल अशी माहिती देखील समोर येत आहे.
हेही वाचा - Praveen Darekar : दरेकर यांची अटकपूर्व जामीनासाठी धावपळ; मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल