ETV Bharat / city

ST Employee death in Sion : मुंबईतील सायन हाॅस्पिटलमध्ये एस.टी कर्मचाऱ्याचा मृत्यू

सायन हाॅस्पिटलमध्ये एका एस.टी कर्मचाऱ्याचा ( ST Employee death in Sion ) मृत्यू झाला आहे. महेश लोले असे एस टी कर्मचाऱ्याचे नाव असून ते एसटी कंडक्टर होते. परळ एसटी डेपो जवळ ते मृतावस्थेत आढळले होते. लोले यांचा आंदोलकांशी संबंध आहे की नाही, हे स्पष्ट नाही.

ST employee dies at Sion Hospital in Mumbai
महेश लोले एसटी कर्मचारी मृत्यू सायन
author img

By

Published : Apr 9, 2022, 10:10 AM IST

Updated : Apr 9, 2022, 12:41 PM IST

मुंबई - सायन हाॅस्पिटलमध्ये एका एस.टी कर्मचाऱ्याचा ( ST Employee death in Sion ) मृत्यू झाला आहे. महेश लोले असे एस टी कर्मचाऱ्याचे नाव असून ते एसटी कंडक्टर होते. परळ एसटी डेपो जवळ ते मृतावस्थेत आढळलेत. लोले यांचा आंदोलकांशी संबंध आहे की नाही, हे स्पष्ट नाही.

हेही वाचा - Criminal Money : प्रविण राऊतांना मिळालेले 50 लाख गुन्हेगारी स्वरुपाचे, ईडी दोषारोपपत्रात माहिती

गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला काल आक्रमक स्वरूप ( ST Workers Protesting ) मिळाले. शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर धडक ( ST Worker Agitation At Silver Oak ) दिली. या आंदोलनादरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्यासह अजित पवार यांच्याविरोधात नारेबाजी करत त्यांच्या घरासमोर चप्पलफेक, दगडफेक केली. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आंदोलकांना यलो गेट पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. या आंदोलनातील आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यामध्ये महिलांचाही समावेश आहे. या आंदोलकांशी लोले यांचा काही संबंध आहे की नाही? हे अद्याप स्पष्ट नाही.

हेही वाचा - INS Vikrant Case : आयएनएस विक्रांत प्रकरणात सोमय्या पिता-पुत्रांला मुंबई पोलिसांची समन्स

Last Updated : Apr 9, 2022, 12:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.