मुंबई - कोरोनाचा एक संशयित रुग्ण मंत्रालयात १६ मार्चला मिळाल्यानंतर मंत्रालयातील प्रत्येक कार्यालय, मंत्र्यांची दालने सार्वजनिक बांधकाम विभाग रसायन टाकून स्वच्छ करून घेतली होती. आज त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या 'ए' वार्डमधील कीटक नियंत्रक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मंत्रालयातील प्रत्येक ठिकाण निर्जंतुकीकरण करणे सुरू केले आहे.
Coronavirus : मंत्रालयात महापालिका कर्मचाऱ्यांकडून निर्जंतुकीकरण फवारणी
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मंत्रालयातील प्रत्येक कार्यालय, मंत्र्यांची दालने सार्वजनिक बांधकाम विभाग रसायन टाकून स्वच्छ करून घेण्यात येत आहेत. आज पहिल्या दिवशी मुख्य इमारतीतील प्रत्येक ठिकाणावर ही फवारणी करून येथील परिसर हायड्रो क्लोराईडने निर्जंतुकीकरण करण्यात आला.
फवारणी करताना महापालिका कर्मचारी
मुंबई - कोरोनाचा एक संशयित रुग्ण मंत्रालयात १६ मार्चला मिळाल्यानंतर मंत्रालयातील प्रत्येक कार्यालय, मंत्र्यांची दालने सार्वजनिक बांधकाम विभाग रसायन टाकून स्वच्छ करून घेतली होती. आज त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या 'ए' वार्डमधील कीटक नियंत्रक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मंत्रालयातील प्रत्येक ठिकाण निर्जंतुकीकरण करणे सुरू केले आहे.
हायड्रो क्लोराईड सारख्या रसायनामुळे हवेत आणि विविध ठिकाणांवर असलेले जंतू, विषाणू नष्ट होतात. यामुळे आज आम्ही पहिल्या दिवशी मंत्रालयातील मुख्य इमारतीतील प्रत्येक ठिकाणावर ही फवारणी करून येथील परिसर हायड्रो क्लोराईडने निर्जंतुकीकरण करत असल्याची माहिती महापालिका कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
तसेच आमच्या वार्डामध्ये संपूर्ण परिसरात आमचे हे निर्जंतुकीकरण करण्याचे काम दिवसरात्र सुरू आहे. मुंबई आणि देशावर जे कोरोनाचे संकट उभे राहिले, ते आम्ही कामाच्या माध्यमातून कमी करण्याचा प्रयत्न करतो, असेही या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. मंत्रालयातील प्रत्येक ठिकाणावर निर्जंतुकीकरण करण्यासाठी 'ए'वार्डच्या कीटक नियंत्रक विभागातील पर्यवेक्षक अधिकारीही सोबत असून ते एकूण कामाची माहिती घेताना दिसत आहेत.