मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांत राजपूत याच्या आत्महत्येला दीड वर्ष पूर्ण झाले आहे. याप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला सीबीआयकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिला काही काळ जेलमध्येदेखील राहावे लागले होते, मात्र आता रिया चक्रवतीला विशेष डीपीएस कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. रियाचे बँक अकाउंट एनसीबीने सील केले होते, आज या अकाउंटवरील बंदी न्यायालयाने उठविली आहे.
हेही वाचा - मालदीवमधील वसूलीनंतर रिया चक्रवर्तीला अटक - मंत्री नवाब मलिक
गरजेचे सामान जप्त
सुशांत राजपूत मृत्यू प्रकरणी ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रियावर कारवाई करून अटक केली होती. यामुळे रियाला काही दिवस तुरुंगात काढावे लागले. एवढेच नाहीतर नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सब्सटेन्स अॅक्टअंतर्गत कोर्टाने रियाचे बँक अकाऊंट गोठवले आणि गरजेचे सामान जप्त केले होते. आता वर्षभरानंतर तिचे अकाउंट डीफ्रीज करण्याचा निर्णय घेतला आहे. एनडीपीएस कोर्टाने एनसीबीला आदेश दिले आहेत, की रिया चक्रवर्तीचे बँक अकाऊंट डिफ्रीज करा, जे गेल्या वर्षभरापासून एजेन्सीने फ्रीज केले होते.
रियाच्या याचिकेनंतर निर्णय
एनडीपीएस कोर्टाने एनबीसीला हा आदेश रिया चक्रवर्तीची याचिका ध्यानात घेऊन दिला आहे. माहितीनुसार रिया चक्रवर्तीने एनडीपीएस कोर्टात याचिका दाखल करून आपले बँक अकाऊंट डिफ्रीज करण्याची विनंती केली होती. याचिकेच्या माध्यमातून रिया म्हणाली होती, की एनसीबीने कोणत्याही कारणाशिवाय १६/०९/२०२०पासून तिचे बँक अकाऊंट आणि एफडी फ्रीज केले आहेत.
निर्माण होत आहेत समस्या
पुढे याचिकेत म्हटले आहे, की तिला कर्मचाऱ्यांचे वेतन आणि जीएसटीसारखे व्यवहार पूर्ण करण्यासाठी बँक अकाऊंट गरजेचे आहे. तिचा भाऊ तिच्यावर अवलंबून आहे आणि ती स्वतःच्या खर्चासाठी बँक अकाऊंटमध्ये पैसे ठेवते. परंतु १० महिन्यांपासून बँक अकाऊंट गोठवण्यात आले आहे, ज्यामुळे तिला समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे बँक अकाऊंट डीफ्रीज केले पाहिजे.
हेही वाचा - फोटोग्राफर्स डायरी : रिया, जान्हवीसह अनेक बॉलिवूडकर कॅमेऱ्यात कैद
याचिकेत काय?
रियाने दुसऱ्या एका याचिकेत आपले गॅझेट, मॅकबुक प्रो, अॅपल लॅपटॉप आणि अॅपल आयफोन परत करण्याची मागणी केली आहे. कोर्टाने यावर आदेश दिले, की योग्य पडताळणीनंतर गॅझेट रिया चक्रवर्तीला परत केले जाईल आणि एक लाख रुपयांचा नुकसान भरपाई बाँड अंमलात आणला जाईल.