मुंबई - शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून सुरू असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेला परवानगी देत पडदा टाकला. शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. बाळासाहेबांचा शिवसैनिक खिलाडू वृत्तीने वागतो उन्मादपणाने नाही (Spirit of sportsmanship in Balasahebs Shiv Sainik), असा चिमटा शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाला काढला. दादर येथील शिवसेना भवन येथे त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
शिवसेना जिंदाबादचा नारा - शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास मुंबई महापालिकेकडे शिवसेना आणि शिंदे गटाचे अर्ज फेटाळून लावले. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. शिंदे गटाने ही न्यायालयात दाद मागितली. तर बंडखोर आमदार सदा सरवणकर यांनी मध्यस्थी याचिका दाखल केली. या याचिकांवर दिवसभर झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला शिवतीर्थवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेना जिंदाबादचा नारा दिला. अंधारे यांच्या जोरदार घोषणाबाजीनंतर शिवसैनिकांनीही मोठा जल्लोष केला.
सत्य परेशान होऊ शकते पराजित नाही - माझा पहिला दसरा मेळावा असला तरी खूप आनंद आहे. गटप्रमुखांच्या मेळाव्यातील शिवसेना पक्षप्रमुखांच्या भाषणाचा ठसका दिल्लीपर्यंत पोहोचला होता. आता दसरा मेळाव्यातील भाषण ठसकेबाजच नसेल तर भल्याभल्यांच्या जिव्हारी लागेल, असे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले. राज्यासह देशात उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाचा दरारा कायम असेल, असा इशारा शिंदे गटाला दिला.
शिवसैनिक खिलाडू वृत्तीने वागतो - बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे असे नुसते म्हणून चालत नाही. बाळासाहेबांचा शिवसैनिक खिलाडी वृत्तीने वागतो, उन्मादकपणाने नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक महिलांचा आदर करतो. रामदास कदमांसारखे वक्तव्य करत नाही. शिवसैनिक संघर्षशील आहे, तो महाराष्ट्र सोडून पळून जाऊ शकत नाही. (Sushma Andhare attacked Shinde group) तो निधड्या छातीने विरोधकांचा सामना करतो, असा टोला सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांना लगावला.
बाळासाहेबांचा शिवसैनिक खिलाडू वृत्तीने वागतो; उन्मादपणाने नाही, सुषमा अंधारे यांचा शिंदे गटावर घणाघात - सत्य परेशान होऊ शकते पराजित नाही
मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला शिवतीर्थवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेना जिंदाबादचा नारा दिला. (Spirit of sportsmanship in Balasahebs Shiv Sainik) शिवसैनिक खिलाडू वृत्तीचा संघर्षशील आहे, तो महाराष्ट्र सोडून पळून जाऊ शकत नाही. तो निधड्या छातीने विरोधकांचा सामना करतो, असा टोला सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांना लगावला (Sushma Andhare attacked Shinde group).