ETV Bharat / city

दुसऱ्या दिवशीही कोकणातील विशेष रेल्वे गाड्या धावल्या रिकाम्याच - mumbai special train for kokan chakarmani

कोकणात जाण्यासाठी 15ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान विशेष गाड्या धावणार आहेत. दररोज मुंबईतून 01101 सीएसएमटी ते सावंतवाडी रोड एक्स्प्रेस, 01103 एलटीटी ते कुडाळ एक्स्प्रेस, 01105 सीएसएमटी ते सावंतवाडी रोड, 01107 एलटीटी ते रत्नागिरी एक्स्प्रेस या कोकणात जाणार्‍या चार गणपती विशेष गाड्या धावत आहेत.

special trains run empty for kokan ganeshotsav from mumbai second day

author img

By

Published : Aug 17, 2020, 1:08 PM IST

मुंबई - गणेशोत्सव आठवड्यावर आला असताना कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. परिणामी सर्व चाकरमानी रस्तेमार्गे आधीच कोकणात पोहोचल्याने रेल्वे गाड्यांना अल्प प्रतिसाद मिळत आहे. दुसर्‍या दिवशीही फक्त चार गाड्यांमध्ये 6 हजार 392 आसन क्षमतेपैकी फक्त 255 तिकिटे बुक झाली.

कोकणात जाण्यासाठी 15ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान विशेष गाड्या धावणार आहेत. दररोज मुंबईतून 01101 सीएसएमटी ते सावंतवाडी रोड एक्स्प्रेस, 01103 एलटीटी ते कुडाळ एक्स्प्रेस, 01105 सीएसएमटी ते सावंतवाडी रोड, 01107 एलटीटी ते रत्नागिरी एक्स्प्रेस या कोकणात जाणार्‍या चार गणपती विशेष गाड्या धावत आहेत. प्रत्येक रेल्वे गाड्याची आसन क्षमता ही 1 हजार 598 एवढी आहे, तर या चारही गणपती विशेष गाड्यांची प्रवासी क्षमता 6 हजार 552 इतकी आहे. पहिल्या दिवशी 1 हजार 48 प्रवासी कोकणात गेले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी 255 प्रवाशांनी संध्याकाळी 6वाजेपर्यंत तिकीट आरक्षण केले.

दरवर्षी कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जातात. मात्र, यंदा कोरोनामुळे गाड्या चालवण्याचा निर्णय उशिरा घेतल्याने अल्प प्रवासी लाभल्यामुळे रेल्वेला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

011011 सीएसएमटी ते सावंतवाडी रोड एक्स्प्रेस 78
01103 एलटीटी ते कुडाळ एक्स्प्रेस 48
01105 सीएसएमटी ते सावंतवाडी रोड 81
01107 एलटीटी ते रत्नागिरी एक्स्प्रेस 48

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.