मुंबई - अजित पवारांनी तडकाफडकी राजीनामा देण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही त्यांनी अशाच पद्धतीने तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांच्या या स्वभावाची सवय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही आहे. त्यावेळी शरद पवारांनी आक्रमक भूमिका घेत अजित पवार यांच्या स्वभावाला मुरड घालण्यास भाग पाडले होते. शिवाय मीच सांगेन तेच अंतिम असेल असे शरद पवारांनी दरडावताच सर्व काही सुरळीत झाले होते.
अजित पवारांवर जलसंपदा घोटाळ्याचे आरोप होत होते. त्यावेळी अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते. सतत होणाऱ्या आरोपामुळे अजितदादा मंत्रालयात बसले असताना तडकाफडकी राजभवनवर गेले. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीत भूकंपच आला. अजित पवारांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे काही मंत्रीही राजीनाम्याच्या तयारीत होते. हे सर्व होत असताना त्याची कोणतीही कल्पना पक्षाध्यक्ष शरद पवार यांना नव्हती.
ही बाब शरद पवारांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पक्षाची बैठक बोलावली. त्याआधी त्यांनी अजित पवारांची कृती चुकीची होती असे सांगत बैठकीत काय होणार याचे संकेतच देवून टाकले. अजित पवारांच्या समर्थनार्थ राजीनामे देण्यासाठी राष्ट्रवादीचे मंत्री तयार होते. सर्वा काही ठरले होते. शरद पवार आले आणि सर्व माहोलच बदलून गेला. राजीनामे हवेत विरले आणि पवारांच्या दणक्याने सर्वचजण चिडीचूप झाले. " पक्षाचा अध्यक्ष अजून मीच आहे. त्यामुळे काय निर्णय घ्यायचा हे मीच ठरवणार आहे. परस्पर कोणी निर्णय घेऊ नये, तशी मी कोणाला परवानगी दिली नाही " असे वक्तव्य करत शरद पवारांनी अजितदादांना जो काही संदेश द्यायचा होता तो दिला. त्यानंतर राजीनामा नाट्य संपले. पुढे काही महिन्यात अजित पवारांचा पून्हा मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला.
शुक्रवारी २७ सप्टेबरला अजित पवारांनी पून्हा एकदा आमदारकीचा राजीनामा दिला. यात समान धागा असा होता की, त्यांनी याची कल्पना शरद पवारांना दिली नाही. हे पवारांनीही पुण्याच्या पत्रकार परिषदेत सांगितले. शिवाय कुटूंबात कोणताही वाद नाही. मी सर्वांबरोबर चर्चा करणार आहे. पण, कुटूंब प्रमुख म्हणून मी घेईन तोच निर्णय अंतिम असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे २००९ च्याच वक्तव्याची आठवण अजितदादांना शरद पवारांनी पुन्हा एकदा करून दिली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
या आधीही अजित पवारांनी तडकाफडकी दिला होता राजीनामा !

Conclusion: