ETV Bharat / city

Lata Mangeshkar Passed Away : लतादिदींच्या काही खास गाण्यांचे खास किस्से

लता मंगेशकर यांनी 'पहिली मंगळागौर' या चित्रपटासाठी पहिल्यांदा पार्श्वगायन केले. त्या भारताच्या सुमारे सर्व भाषांती सर्वश्रेष्ठ गायिकांपैकी होत्या. (Lata Mangeshkar) भारतीय संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखले जाते. 1942 मध्ये लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली आणि गेल्या सहा दशकांपेक्षा अधिक काळापासून त्यांची ही कारकीर्द सबंध जगावर गारूड घालून आहे.

लतादिदींच्या काही खास गाण्यांचे खास किस्से

author img

By

Published : Feb 6, 2022, 10:17 AM IST

मुंबई - गानसम्राज्ञी लता मंगेशकर... लता मंगेशकर यांची खरंतर ओळख करुन द्यायची गरज नाही. देश-विदेशातील तब्बल ३६ वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांनी असंख्य गाणी गायली आहेत. त्यांची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झाली आहे. (Lata Mangeshkar passes away) तसेच, देशातील सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न'ही त्यांना देण्यात आला आहे. (Latadidi's special songs) आज त्या आपल्यात नाहीत. (lata mangeshkar songs) त्यांचे आज (दि. 6 जानेवारी)रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास निधन झाले. याच पार्श्वभूमीवर पाहूयात त्यांच्या काही खास गाण्यांबाबतचे खास किस्से...

लता मंगेशकर उर्फ लतादिदींचा जन्म १९२९ला झाला. पंडीत दीनानाथ मंगेशकर यांची सर्वात मोठी मुलगी म्हणजे लतादिदी. लतादिदींनी लक्ष्मीकांत-प्यारेलाल, मदन मोहन, एस.डी. बर्मन, आर.डी. बर्मन आणि ए. आर. रहमान अशा अनेक दिग्गज संगीतकारांसोबत काम केले आहे.

लतादिदींच्या कारकीर्दीतील एक अजरामर गाणे म्हणजे, 'लग जा गले'. १९६४च्या 'वो कौन थी' या चित्रपटातील हे गाणे कधीही जुने होऊ शकत नाही, असे लता स्वतःच म्हणाल्या होत्या.

लतादिदींची कारकीर्द ही मदन मोहन यांच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहे. मदन मोहन आणि लतादिदींच्या सर्वोत्कृष्ट दहा गाण्यांपैकी 'आपकी नजरोंने समझा...' हे गाणे नक्कीच नेहमी सर्वात वर राहील..

'ए मेरे वतन के लोगो' हे गाणं ऐकल्यानंतर देशभक्तीचे स्फुरण चढत नाही असा व्यकी निराळाच! या गाण्यासाठी लतादिदी केवळ एकाच अटीवर मंजूरी दिली होती, ती म्हणजे रामचंद्र यांनी त्या गाण्याला सोलो ठेवावे. रामचंद्र यांनी ही मागणी मान्य केली, मात्र गाण्याचे रेकॉर्डिंग झाल्यानंतर त्याला ड्युएट केले.

'ये कहाँ आ गए हम' या गाण्याचे रेकॉर्डिंग हे लतादिदी आणि अमिताभ बच्चन यांनी वेगवेगळे केले होते. आता हे दोघेही याबाबत बोलताना पश्चाताप व्यक्त करतात. एकमेकांची लवकरच ओळख करुन घेण्याची ही संधी गमावल्याचे दुःख दोघांनाही वाटते..

हेमा मालिनी आणि राजेश खन्नाचा कुदरत हा एक म्युझिकल ब्लॉकबस्टर ठरला. आर. डी. बरमन यांचे संगीत, सुलतानपुरी यांनी लिहिलेली गाणी आणि लता दिदींचा आवाज असा सुरेख संगम या चित्रपटात पहायला मिळाला. यातील 'तूने ओ रंगीला कैसा जादू किया' हे गाणे आजही लोकांच्या ओठांवर असते..

१९६५च्या 'गाईड'मधील 'आज फिर जीने की तमन्ना है' या गाण्याचे बोल ऐकून लतादिदींनी खरंतर या गाण्याला नकार दिला होता. मात्र, विजय आनंद यांनी ज्याप्रकारे या गाण्याचे दिग्दर्शन केले, आणि वहिदा रहमान यांचा या गाण्यातील परफॉर्मन्स पाहून लता दिदींनी आपला विचार बदलला.

'हम दोनो' चित्रपटातील 'अल्ला तेरो नाम' हे गीत हिंदी गाण्यांमधील एक सुंदर असे प्रार्थनागीत आहे. पाकिस्तानी गायक/गझलकार राहत फतेह अली खान यांनी या गाण्यासाठी लतादिदींचे कौतुक केले होते.

लता दिदींनी आपल्या आवाजाने कित्येक चित्रपटगीते अजरामर करुन ठेवली. मात्र आपल्याला चित्रपटांसाठी गाणे आवडत नसल्याचे त्यांनी नुकतेच एका मुलाखतीत सांगितले होते. त्यांना अजूनही गाणे सुरू ठेवायचे आहे, मात्र चित्रपटासाठी नाही असे त्या म्हणाल्या होत्या.

हेही वाचा - Lata Mangeshkar Passed Away : लता मंगेशकर यांचे निधन, ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.