ETV Bharat / city

Rajya Sabha election : राज्यसभा निवडणुकीचा रंगला आखाडा; संभाजी राजेंच्या नाराजीने आगामी निवडणुकीचे बदलणार गणित

संभाजी राजे यांनी राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेताच, मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. राज्यभरात शिवसेनेच्या विरोधात नाराजीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, शाहू महाराजांनी संभाजी राजेंचा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या इशाऱ्यावर घेतल्याचे खबळबजनक विधान केले. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे.

Rajya Sabha election
संपादित छायाचित्र
author img

By

Published : May 31, 2022, 12:34 PM IST

Updated : Jun 2, 2022, 1:30 PM IST

मुंबई - राज्यसभेच्या निवडणुकीतून संभाजी राजे यांनी माघार घेताच, मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. राज्यभरात शिवसेनेच्या विरोधात नाराजीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, शाहू महाराजांनी संभाजी राजेंचा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या इशाऱ्यावर घेतल्याचे खबळबजनक विधान केले. त्यामुळे संतप्त झालेल्या मराठा समाजानेही नरमाईची भूमिका घेतली आहे. ही बाब शिवसेनेच्या पथ्यावर पडली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेला फायदेशीर ठरणार आहे.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणार निवडणूक - राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. निवडणुकीत संभाजी राजेंनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता. सर्व आमदारांना पत्र लिहून सहकार्याचे आवाहन केले. परंतु, आघाडी सरकारमधील संख्याबळानुसार शिवसेनेने दोन उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. संभाजी राजेंना सेनेकडून राज्यसभेवर जाण्याची ऑफर देण्यात आली. संभाजी राजेंनी ती फेटाळून लावत, अपक्ष लढण्यावर ठाम राहिले. अखेर शिवसेनेने संजय पवार यांना रिंगणात उतरवले. मतांचे गणित न जुळल्याने संभाजी राजेंनी निवडणुकीतून माघार घेतली. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला, अशी खंत व्यक्त केली. मराठा समाज शिवसेनेच्या विरोधात संतप्त झाला होता. मात्र, संभाजी राजेंचे वडील शाहू महाराज छत्रपतींनी या सर्व राजकीय खेळी मागे देवेंद्र फडणवीस आणि भाजप हेच असल्याचे ठणकावले. तसेच संभाजी राजेंनी आजवर घेतलेल्या राजकीय भूमिका वैयक्तिक होत्या, असे त्यांनी स्पष्ट केले. यावर वडिलांनीच भाष्य केल्याने संभाजी राजेंची आता कोंडी झाली आहे. शिवाय, शिवसेनेच्या विरोधात उभा ठाकलेल्या मराठा समाजानेही मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

राजकीय पक्षांचा अजेंडा - राज्यसभेचे पद सहा वर्षांकरिता असते. छत्रपतींच्या घराण्याला मोठा वारसा आहे. विशिष्ट्य समाज घटकांशी त्यांना जोडता येणार नाही. आजवर त्यांनी सर्वसमावेशक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाच्या संघटनांकडून संभाजी राजेंच्या उमेदवारी वेळी राजकारणाचा रंग देण्याचा प्रयत्न केला असता, तरी समाजाच्या नावावर कोणालाही मत मागता येत नाही. कायदेशीर तसे अधिकार नाहीत. परंतु, न्याय हक्काच्या मागण्यांसाठी समाजाची ताकद लावता जाते. राजकीय पक्षांची भूमिका, हा त्या त्या पक्षांचा अजेंडा असतो, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाचे विरेंद्र पवार यांनी सांगितले.

खरी वस्तुस्थिती लवकरच - मराठा समाजाला शिवसेनेच्या विरोधात ढाल म्हणून वापरणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे शाहू राजेंनी पितळ उघडे पाडले आहे. छत्रपती संभाजी राजेंच्या आडून शिवसेनेला लक्ष्य करण्याचा प्रयत्नही फसला आहे. तसेच भाजपने राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार देऊन छत्रपतींचा वापर केल्याचे संदेश मराठा समाजात गेला आहे. त्यामुळे मराठा समाजालाही भाजपचे षडयंत्र लक्षात आले असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत खरी वस्तुस्थिती लवकरच समोर येईल. तसेच मराठा समाजाचा शिवसेनेवरील रोष देखील कमी होऊन त्याचा फायदा सेनेला होईल, असा अंदाज वरिष्ठ पत्रकार श्रीरंग सुर्वे यांनी वर्तवला आहे.

Last Updated : Jun 2, 2022, 1:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.