मुंबई - शहरात जूनच्या अखेरीपासून जुलैच्या मध्यापर्यंत मुंबई आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात (Mumbai Water Supply Dam) चांगला पाऊस पडला. यामुळे मुंबईला पाणीपुरवठा (Mumbai Water Supply Dam) करणाऱ्या धरणांमध्ये ८८ टक्के पाणीसाठा ( water stock ) जमा झाला होता. मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने धरणातील पाणीसाठा वाढला नव्हता. मात्र आता पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने धरणामध्ये ९० टक्के ( 90 percent of Dams Full ) पाणीसाठा ( water stock ) जमा झाला आहे. मुंबईची वर्षभराची तहान भागवायला आणखी दीड लाख दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज आहे.
धरणांमध्ये ९० टक्के पाणीसाठा - मुंबईमध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पाऊस पडतो. मात्र जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडला नाही. २९ जूनपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. २९ जूनला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या ७ धरणांमध्ये (Mumbai Water Supply Dam) १ लाख ४७ हजार ६ दशलक्ष लिटर म्हणजेच १०.१६ टक्के पाणीसाठा ( water stock ) होता. आज ( ६ ऑगस्ट) सकाळी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये १३,०२,७७५ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. धरणांमध्ये सध्या ९०.०१ टक्के पाणीसाठा ( water stock ) जमा झाला आहे. सध्या धरणात ३३८ दिवसांचा पाणी साठा आहे. मुंबईला ११ महिने पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे.
१,४४,५८८ दशलक्ष लिटर पाण्याची गरज - मुंबईला वर्षाला १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची (Mumbai Water Supply Dam) गरज भासते. सध्या धरणामध्ये १३,०२,७७५ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. हा ९० टक्के पाणीसाठा ( water stock ) आहे. महापालिकेची सातही धरणे भरण्यासाठी १,४४,५८८ दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज आहे. आतापर्यंत मोडक सागर, तानसा आणि तुळशी ही तीन धरणे भरून वाहू लागली आहेत. सध्या ११ महिने पुरेल इतका पाणीसाठा ( water stock ) आहे. ऑगस्ट महिना सुरु आहे. सप्टेंबर महिन्यातही पाऊस पडेल. यामुळे धरणे भरतील. सप्टेंबरच्या अखेरीस पाण्याचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर पाणी पुरवठ्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पालिकेच्या जल विभागाकडून देण्यात आली आहे.
३८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा - मुंबईला वर्षाला १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची (Mumbai Water Supply) गरज भासते. जून ते सप्टेंबर दरम्यान पडणाऱ्या पावसामुळे हा पाणीसाठा ( water stock ) जमा होत होता. मात्र यंदा जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. यामुळे २७ जून रोजी १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. ८ जुलैला धरणात २५ टक्के पाणी साठा ( water stock ) जमा झाल्यावर पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. धरणांतून दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. त्यामधील ठाणे, भिवंडी महानगरपालिकेला दररोज १५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येतो.
६ ऑगस्टला एकूण पाणीसाठा
२०२२ मध्ये १३,०२,७७५ दशलक्ष लिटर (९०.०१ टक्के)
२०२१ मध्ये २१,५७,१६१ दशलक्ष लिटर (७९.९५ टक्के)
२०२० मध्ये ६,००,१५६ दशलक्ष लिटर (४१.४७ टक्के)
धरणातील पाणीसाठा
अप्पर वैतरणा १,८९,८९० दशलक्ष लिटर
मोडक सागर १,२५,७६१ दशलक्ष लिटर
तानसा १,४४,०६३ दशलक्ष लिटर
मध्य वैतरणा १,८४,८९९ दशलक्ष लिटर
भातसा ६,२८,४३१ दशलक्ष लिटर
विहार २१,६८४ दशलक्ष लिटर
तुलसी ८,०४६ दशलक्ष लिटर