ETV Bharat / city

Merit Animal Movie मेरिट अ‍ॅनिमल चित्रपटाला 'स्पेशल फेस्टिव्हल मेन्शन' पुरस्कार - 10 वा भारतीय सिने चित्रपट महोत्सव

मुलांच्या बालपणावर आधारित (Movie based on childhood)चित्रपट निर्मात्या व अभिनेत्री रीना जाधव यांच्या 'मेरिट अ‍ॅनिमल' या चित्रपटाला मुंबईत झालेल्या 10व्या भारतीय सिने चित्रपट महोत्सवात 'स्पेशल फेस्टिव्हल मेन्शन' पुरस्कार (Special Festival Mention Award for Merit Animal) मिळाला आहे.

Merit Animal Movie
मेरिट अ‍ॅनिमल चित्रपट
author img

By

Published : Sep 19, 2022, 1:21 PM IST

मुंबई - मुलांच्या बालपणावर आधारित (Movie based on childhood)चित्रपट निर्मात्या व अभिनेत्री रीना जाधव यांच्या 'मेरिट अ‍ॅनिमल' या चित्रपटाला मुंबईत झालेल्या 10व्या भारतीय सिने चित्रपट महोत्सवात "स्पेशल फेस्टिव्हल मेन्शन" पुरस्कार (Special Festival Mention Award for Merit Animal) मिळाला आहे. प्रतिष्ठित 10 व्या भारतीय सिने चित्रपट महोत्सवात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि लघुपट दाखवण्यात आले. त्यात 'मेरिट अ‍ॅनिमल' या चित्रपटाला हा पुरस्कार देण्यात आला आहे. याआधीही या चित्रपटाला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करतांना चित्रपट निर्मात्या रीना जाधव

बालपन दुर्लक्षित होता कामा नये - मेरिट अ‍ॅनिमल या चित्रपटाला 10व्या इंडियन सिने फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्पेशल फेस्टिव्हल मेन्शन अवॉर्ड देवून सन्मानित करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर चित्रपट निर्मात्या व अभिनेत्री रीना जाधव बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, 'आपली स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या मुलांवर सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा भार टाकला आहे. आपल्याला जीवनाच्या सर्वच क्षेत्रात अव्वल व्हायचे असते, तसा प्रयत्न करा. परंतू यामुळे बालपन दुर्लक्षित होता कामा नये; असे रीना जाधव सांगितले. ही कथा आजच्या शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न निर्माण करत नाही. तर ती मुलांच्या पालकांबद्दल बोलते; जे आपल्या मुलांवर त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ओझे लादतात. गुणवत्तेच्या या शर्यतीत प्रत्येकजण अव्वल आहे. जगायचे आहे पण आपण दुर्लक्ष करतो ते बालपण. 'मेरिट अ‍ॅनिमल' हा चित्रपट आजच्या समाजासाठी डोळे उघडणारा आहे, असे रीना जाधव यांनी सांगितले.

चित्रपटाला चांगला प्रतिसाद - 'मेरिट अ‍ॅनिमल' हा लहान मुलांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. ही कथा आजच्या शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न निर्माण करीत नाही. तर त्या मुलांच्या पालकांच्या वागणुकीवरही या चित्रपटातील कथेने प्रकाश टाकला आहे, ज्या मुलांचे आई-वडील आपल्या अपेक्षा मुलांवर लादुन त्यांचे बालपण हीरावतात. गुणवत्तेच्या या शर्यतीत प्रत्येकजण अव्वल आहे. जगायचे आहे पण आपण दुर्लक्ष करतो ते बालपण. मेरिट अ‍ॅनिमल हा चित्रपट आजच्या समाजासाठी डोळे उघडणारा आहे. मेरिट अ‍ॅनिमल हंगामा प्ले हा चित्रपट OTT वर प्रदर्शित झाला आहे.

चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार - या चित्रपटाने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रेक्षकांची तसेच ज्युरींची मने जिंकली आहेत. चित्रपटाने इस्तंबूल चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण) - युरोप चित्रपट महोत्सव, सर्वोत्कृष्ट प्रेरणादायी चित्रपट - टोकियो चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट - आवृत्ती स्प्रिंग सिनेफेस्ट, इंडो फ्रेंच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, अहमदाबाद बालचित्रपट महोत्सव, दरभंगा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. फिल्म फेस्टिव्हल, सहरसा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, म्युझियम टॉकीज फिल्म फेस्टिव्हलमध्येही अधिकृत निवड झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.