ETV Bharat / city

Bhima Koregaon Case : सुरेंद्र गडलिंग यांना कारागृहामध्ये लॅपटॉप वापरता येणार; सत्र न्यायालयाची परवानगी - भिमा कोरेगाव प्रकरणातील सुरेंद्र गडलिंग

एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी सुरेंद्र गडलिंग यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष NIA कोर्टात दोन अर्ज दाखल केले होते. (Bhima Koregaon Case ) त्यापैकी न्यायालयाने त्यांचा एक अर्ज मान्य केला आहे. आठवड्यातून दोन दिवस त्यांना कारागृहामध्ये लॅपटॉपवर केस संदर्भातील काम करता येईल, यासंदर्भातील न्यायालयाने जेल प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

सुरेंद्र गडलिंग
सुरेंद्र गडलिंग
author img

By

Published : Mar 17, 2022, 9:10 AM IST

मुंबई - भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी सुरेंद्र गडलिंग यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष NIA कोर्टात दोन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी न्यायालयाने त्यांचा एक अर्ज मान्य केला आहे. (Elgar Parishad Case) आठवड्यातून दोन दिवस त्यांना कारागृहामध्ये लॅपटॉपवर केस संदर्भातील काम करता येईल, यासंदर्भातील न्यायालयाने जेल प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

आठवड्यातील सोमवार आणि बुधवारी लॅपटॉपचा वापर करू शकतात

भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी सुरेंद्र गडलिंग हे गेल्या चार वर्षांपासून जेलमध्ये आहेत. (Bhima Koregaon accused Surendra Gadling ) त्यांना त्यांच्या केस संदर्भातील माहिती तसेच इतर केसेस संदर्भातील रेफरन्स पाहण्यासाठी लॅपटॉपचा तसेच इंटरनेट सुविधा देण्यात करिता न्यायालयाने आज परवानगी दिली आहे. आठवड्यातील सोमवार आणि बुधवार या दोन दिवशी ते लॅपटॉपचा उपयोग करू शकतात असे NIA विशेष न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

सुधा भारद्वाज आणि वरावरा राव यांना वैद्यकीय कारणामुळे जामीन मिळाला

सुरेंद्र गडलिंग हे गेल्या चार वर्षांपासून जेलमध्ये आहेत. त्यांचा यापूर्वी विशेष न्यायालयात डिफॉल्ट जामीन तसेच रेगुलर जामीन विशेष न्यायालयाकडून फेटाळण्यात आला होता. या प्रकरणात सुधा भारद्वाज आणि वरावरा राव यांना वैद्यकीय कारणामुळे जामीन मिळाला आहे. इतर आरोपींना अद्याप न्यायालयाकडून जामीन मिळालेला नाही.

फरार आरोपी मिलिंद तेलतुंबडे यांचा समावेश

भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कार्यकर्ते रोना विल्सन, नागपूरस्थित वकील सुरेंद्र गडलिंग, नागपूर विद्यापीठाच्या प्राध्यापक शोमा सेन, महेश राऊत, रिपब्लिकन पँथर्सचे सुधीर ढवळे, वकील कार्यकर्ते सुधा भारद्वाज, तेलुगू कवी पी. वरवरा राव, कार्यकर्ते अरुण फरेरा आणि वेरनॉन गोन्साल्विस आहेत. मृत स्टेन स्वामी, गौतम नवलखा, प्राध्यापक हनी बाबू, सागर गोरखा, रमेश गायचोर, ज्योती जगताप व फरार आरोपी मिलिंद तेलतुंबडे यांचा समावेश आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणात अटक

सुधा भारद्वाज यांच्यावर शहरी नक्षली असल्याचा ठपका ठेवत पुणे पोलिसांनी त्यांना भीमा कोरेगाव हिंसाचार एलगार परिषद प्रकरणात 6 जून 2018 ला अटक केली. त्यांच्यासह अन्य काही वकील, लेखक आणि मानवी हक्क कार्यकर्त्यांनाही अटक करण्यात आली होती. पुणे पोलीस या प्रकरणाची चौकशी करण्यात उशीर करत आहेत. त्यामुळे त्यांच्या एकूण कार्यपद्धतीवरच अनेक प्रश्न उपस्थित होत होते.

काय आहे भीमा कोरेगाव प्रकरण?

पेशव्यांचे मराठा सैन्य आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेल्या युद्धाच्या 200व्या स्मृतिदिनानिमित्त 31 डिसेंबर 2017 रोजी भीमा कोरेगांव शौर्य दिवस प्रेरणा अभियान या कार्यक्रमाअंतर्गत अनेक दलित संघटनांनी एकत्रितपणे एका रॅलीचे आयोजन केले होते. या युद्धात पेशव्यांविरोधात ईस्ट इंडिया कंपनीबरोबर महार रेजिमेंट लढली होती आणि यात बहुतांश दलित सैनिक होते.

या एल्गार परिषदेमागे माओवादी संघटनांचा हात

पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018 रोजी दंगल झाली होती आणि त्या दिवशी इथे लाखोंच्या संख्येने दलित समुदाय जमा होतो. या घटनेचे पडसाद देशभर उमटले होते. या हिंसाचाराला एक दिवस अगोदर म्हणजे 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेतील वक्तव्ये कारणीभूत होती, या तक्रारीवरून पुणे पोलिसांनी स्वतंत्र तपास सुरू केला. या एल्गार परिषदेमागे माओवादी संघटनांचा हात होता असे म्हणत या संघटनांशी कथित संबंध आहेत. या संशयावरून पुणे पोलिसांनी देशभरातल्या विविध भागांतून डाव्या चळवळीशी संबंधित अनेकांना अटक केली.

हेही वाचा - Russia-Ukraine War 22nd Day : अमेरिकेची युक्रेनला मदत! बायडेन म्हणाले पुतीन हे 'युद्ध गुन्हेगार'

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.