ETV Bharat / city

Sentenced In Ransom Case : अंडरवर्ल्ड डॉन गुरु साटम चा मुलगा आणि पुतण्याला खंडणी प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा

2014 मध्ये व्यवसायिकाला 60 लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यात अंडरवर्ल्ड डॉन गुरु साटमचा ( underworld don Guru Satam ) मुलगा आणि पुतण्याला बुधवारी मुंबईतील विशेष न्यायालयाने (Special Court in Mumbai) दोषी ठरवले आहे. सत्र न्यायालयाने या दोघांना 10 वर्षांची शिक्षा (sentenced to 10 years in ransom case) व प्रत्येकी 5 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

court Order
कोर्टाचे आदेश
author img

By

Published : May 31, 2022, 8:00 PM IST

मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा (Underworld don Chhota Rajan) एकेकाळचा जवळचा सहकारी डॉन गुरु (don Guru Satam ) साटम मुलगा भूषण, पुतण्या नरहरी आणि हस्तक पुरणशंकर मिश्रा याला 2015 साली खंडणी प्रकरणी मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी अटक केली होती. गेल्या 7 वर्षापासून तिघेही तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. आज या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने दोघांनाही दोषी ठरवले आहे.

दादरमधील एका विकासकाला गुरु साटमने १० कोटीची खंडणी मागितली होती. या खंडणीचा हप्ता घेण्यासाठी तिघेही आले असताना. खंडणी विरोधी पथकाने त्यांना सापळा रचून रंगेहाथ पकडले होते. गेल्या 30 वर्षांपासून फरार असलेला कुख्यात गँगस्टर गुरु साटम हा दक्षिण आफ्रिकेमध्ये लपला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अलीकडेच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केरळमधून खंडणीच्या एका प्रकरणात साटमचा हस्तक कृष्ण कुमार बाळकृष्ण नायर उर्फ उन्नीला अटक केली होती.

उन्नी गुरु साटमचा जवळचा साथीदार आहे. उन्नी पैसे गोळा करुन हवालामार्गे दक्षिण आफ्रिकेत पाठवत होता. उन्नीच्या अटकेनंतर गुरु साटम भूमिगत झाला होता. दरम्यान साटमचा मुलगा भूषण, पुतण्या नरहरी आणि हस्तक पुरणशंकर मिश्रा यांना न्यायालयाने सुनावलेली शिक्षा साटमसाठी हा मोठा धक्का माणला जात आहे. या दोघांना न्यायालयाने आयपीसी आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या मकोका संबंधित तरतुदींनुसार केलेल्या गुन्ह्यांमध्ये बिल्डरकडून पैसे उकळण्याचा कट रचल्याबद्दल दोषी ठरवले.

खटल्यादरम्यान सरकारी वकील जयसिंग देसाई यांनी 23 साक्षीदार तपासले आणि दावा केला की भूषण हा त्याच्या वडिलां मार्फत चालवल्या जाणार्‍या गुन्हेगारी सिंडिकेटचा एक भाग होता आणि त्याला खंडणीच्या माध्यमातून आर्थिक लाभ देखील मिळाला होता. फिर्यादीनुसार या प्रकरणातील तक्रारदाराच्या एका कर्मचाऱ्याला रिअल इस्टेट डेव्हलपरचा 26 नोव्हेंबर 2014 रोजी फोन आला. फोन करणाऱ्याने स्वत:ची ओळख साटमचा साथीदार असल्याची करून बिल्डरकडे पैशांची मागणी केली होती.

हेही वाचा : Avinash Bhosale Remanded in CBI Custody : अविनाश भोसले यांना 8 जूनपर्यंत सीबीआय कोठडी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.