ETV Bharat / city

'सोमैय्या हे शिखंडीची भूमिका बजावत आहेत, फ्रॉडला समानार्थी शब्द म्हणजे किरीट सोमैय्या' - किरीट सोमैय्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबाशी जमीन व्यवहार केल्याचा आरोप करत सोमैय्या वारंवार शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबईच्या महापौरांवर हल्लाबोल करत आहेत. याला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी जोरदार पलटवार केला आहे.

Mayor Kishori Pednekar
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर
author img

By

Published : Nov 13, 2020, 3:26 PM IST

मुंबई - शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबईच्या महापौरांवर भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी पुन्हा तोफ गाडली आहे. याला प्रत्युत्तर देताना महाभारतात जसे शिखंडीच्या मागून लढाई केली जात होती, तशीच भाजप करत असून सोमय्या हे शिखंडीची भूमिका बजावून आरोप करत आहेत. अशी तिखट प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. फ्रॉडला समानार्थी शब्द म्हणजे किरीट सोमैय्या असल्याचे महापौरांनी म्हटले आहे.

शिखंडीची भूमिका -
भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी अन्वय नाईक यांच्या जमिनीची खरेदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीने केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी ईडीद्वारे चौकशीची मागणी केली आहे. तसेच मुंबईच्या महापौरांबाबत मागणी करूनही चौकशी केली जात नसल्याचे सोमैय्या यांनी म्हटले आहे. यावर उत्तर देताना महापौरांनी सोमैय्या हे शिखंडीची भूमिका पार पाडत असल्याचे म्हटले आहे.

कोर्टात काय ते सिद्ध होईल -
सोमैय्या यांनी मी एसआरएची घरे लाटल्याचा तसेच घरातल्यांना पालिकेचे कंत्राट मिळवून दिल्याचा आरोप केला आहे. यावर बोलताना सोमैय्या यांनी आरोप केले तेव्हाच त्याचे उत्तर दिले आहे. कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. ते कोर्टात गेले आहे. त्यामुळे कोर्टात काय ते सिद्ध होईल असेही महापौर म्हणाल्या. वारंवार तक्रारी करायच्या, लोकांना त्रास द्यायचा, आवाज करायचं एवढंच त्यांचं काम आहे असेही महापौर म्हणाल्या.

आम्ही घाबरत नाही -
किरीट सोमैय्या बिनबुडाचे आरोप करतात, त्यांनी आरोप सिद्ध करावेत, ते आरोप करत राहतील आणि आम्ही त्यांच्या मागे-मागे आरोपांवर उत्तर देत बसणार नाही. आम्ही, उध्दवसाहेब चांगलं काम करत आहोत. ते फक्त व्यत्यय करण्याचं काम करताहेत, आम्ही यांना घाबरत नाही असे महापौर म्हणाल्या.

काय आहे प्रकरण -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबाशी जमीन व्यवहार केल्याचा आरोप सोमैय्या यांनी केला आहे. सोमैय्या यांनी अन्वय नाईक यांची जमीन रश्मी ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांनी खरेदी केल्याचा पुरावा म्हणून सातबाराची प्रत ट्विटरवर शेअर केली आहे. नाईक व ठाकरे कुटुंबीयांच्या आर्थिक संबंधामुळे अर्णबला टार्गेट केले जात आहे, असा आरोप किरीट सोमैय्या यांनी केला आहे.

सोमैय्या यांचा आरोप -

अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक यांचा आत्महत्येप्रकरणी मुद्दाम अटक केली. कारण नाईक परिवार आणि ठाकरे परिवार यांच्यात आर्थिक संबंध आहेत, हे अप्रत्यक्ष गैरव्यवहार आहेत, असा सोमैय्यांचा आरोप आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाईक व ठाकरे तसेच वायकर यांच्याशी झालेल्या जमीन व्यवहाराबाबत खुलासा करावा, अशी मागणी सोमैय्या यांनी केली आहे.

ठाकरे व वायकर यांचे आर्थिक व व्यावसायिक संबंध कसे?रश्मी ठाकरे व मनीषा वायकर कुटुंबीयांचे एका जागेमध्ये नाव समोर आले आहे. रवींद्र वायकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मंत्रीही होते. मनिषा ह्या रवींद्र वायकरांच्या पत्नी आहेत. रश्मी उद्धव ठाकरे व मनिषा वायकर यांचे जागा घेण्यापर्यंत संबंध कधी आले. जर संबंध असतील तर आर्थिक आहेत की, व्यावसायिक आहेत, असा प्रश्न सोमैय्या यांनी उपस्थित केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.