ETV Bharat / city

तर राज्यात मोठ्या लॉकडाऊनची गरज नाही - असलम शेख

author img

By

Published : Apr 10, 2021, 4:04 PM IST

पुन्हा एकदा राज्यात कोरोनाचे आकडे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी आणि वीकेंडला लॉकडाऊन, असा पॅटर्न महाराष्ट्रात सुरू आहे. मात्र नागरिकांकडून अद्यापही नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे बोलल्या जात आहे.

तर राज्यात मोठ्या लॉकडाऊनची गरज नाही - असलम शेख
तर राज्यात मोठ्या लॉकडाऊनची गरज नाही - असलम शेख

मुंबई - पुन्हा एकदा राज्यात कोरोनाचे आकडे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी आणि वीकेंडला लॉकडाऊन, असा पॅटर्न महाराष्ट्रात सुरू आहे. मात्र नागरिकांकडून अद्यापही नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे बोलल्या जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (शनिवार) संध्याकाळी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवाली आहे. या बैठकीत राज्यात मोठा लॉकडाउन लावायचा की काही वेगळा निर्णय घ्यायचा याबद्दल चर्चा होणार आहे. तसेच राज्यात मोठ्या लॉकडाऊनची गरज नसल्याचे मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी स्पष्ट केले.

कोरोनाची साखळी नक्कीच तोडू-

पालकमंत्री असलम शेख म्हणाले, मुंबईकरांना परिस्थितीची चांगली समज आहे. कोरोनाचा प्रभाव वाढताना दिसतोय. अशावेळी शनिवार-रविवारच्या दिवशी अतिमहत्वाचे काम नसेल तर घराबाहेर पडू नका, असं सांगण्यात आलं आहे. गेले काही दिवस नाइट कर्फ्यूमध्ये तरूण मंडळी आपल्या बाईकवरून विनाकारण फिरत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या. त्यामुळे आज मी स्वत:च मुंबईच्या रस्त्यांवर लॉकडाऊनच्या अमलबजावणीची पाहणी करण्यासाठी उतरलो आहे. सध्याचे चित्र पाहून खूप बरं वाटतंय की मुंबईची जनता लॉकडाउनला चांगला प्रतिसाद देत आहे. जर अशाच प्रकारे लोकांनी योग्य ते सर्व नियम पाळले तर आपण कोरोनाची साखळी नक्कीच तोडू. मग अशा परिस्थितीत मोठा लॉकडाउन लावण्याची गरज उद्भवणार नाही", असं सूचक विधान पालकमंत्री शेख यांनी केलं.

व्यापारी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया-

कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी सरकारने सोमवारपासून निर्बंध लागू केले. जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य दुकाने ३० तारखेपर्यंत बंद ठेवण्याच्या आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर व्यापारी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. राज्यात ठिकठिकाणी व्यापारी रस्त्यावर उतरले. व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अन्यथा सोमवारपासून सर्व दुकाने सुरू करण्याचा इशारा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स संघटनेने दिला. तशातच भाजपने व्यापारी वर्गाला पाठिंबा देऊन त्यांच्या भूमिकेचे समर्थनही केले. पण रूग्णसंख्या कमी होत नसल्याने कडक लॉकडाऊन असणं महत्त्वाचं आहे. या मतावर सरकारमधील काही मंडळी ठाम आहेत. याच मुद्द्यावरून आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत नक्की काय निर्णय होतो? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

हेही वाचा- राज्यात आठवडाभर लॉकडाऊन लागण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांनी बोलाविली सर्वपक्षीय बैठक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.