ETV Bharat / city

...म्हणून धनंजय मुंडेंवरील बलात्काराचे आरोप मागे घेतले, रेणू शर्माने सांगितले 'हे' कारण - bjp

रेणू शर्माने सोशल मीडियावर पोस्ट लिहून तक्रार मागे घेण्याचे कारण स्पष्ट केले आहे. तक्रार मागे घेतल्यानंतर भाजपने आता रेणू शर्मावर कारवाईची मागणी केली आहे.

...म्हणून धनंजय मुंडे वरील बलात्काराचे आरोप मागे घेतले, रेणू शर्माने सांगितले 'हे' कारण

author img

By

Published : Jan 22, 2021, 4:51 PM IST

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माने दाखल केलेली तक्रार अखेर मागे घेतलेली आहे. ही तक्रार मागे घेत असताना रेणू शर्माने तिच्या ट्विटर अकाउंटवरून पुन्हा एकदा पोस्ट करून तक्रार मागे घेत असल्याचा खुलासा केलेला आहे.

विरोधकांकडून घेतला जात होता फायदा
तिच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे की, माझी बहीण करुणा शर्मा व धनंजय मुंडे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होता. हा वाद न्यायालयात गेल्यामुळे मी मानसिक दबावाखाली आले होते. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर विरोधकांकडून याचा फायदा घेतला जात असल्याचं माझ्या लक्षात आलं. धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्यासाठी विरोधकांकडून माझ्या खांद्यावर बंदूक ठेवली जात असल्याचं लक्षात आल्यानंतर आपण तक्रार मागे घेतली. माझ्या घरातील कुठल्याही व्यक्तीची बदनामी जर होत असेल तर त्यासाठी मी कोणालाही याचा फायदा होऊ देणार नसल्याचे रेणू शर्माने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. धनंजय मुंडे यांच्यावर लावण्यात आलेले आरोप मागे घेत असून माझ्यावर कुठलाही दबाव नसल्याचे तिने म्हटले आहे.

धनंजय मुंडे यांनी स्वतः कबूल केले होते संबंध
दरम्यान, रेणू शर्मा यांच्या बहीण करूणा शर्मांसोबत सहमतीने 2003 पासून आपले संबंध असल्याचा खुलासा धनंजय मुंडेंनी केला होता. करुणा शर्मा यांच्याकडून आपल्याला दोन मुले झाल्याची कबुलीही त्यांनी दिली होती. या दोघांनाही धनंजय मुंडेंनी स्वतःचे नाव दिले आहे, तसेच त्यांची जबाबदारीही धनंजय मुंडेंनी स्वीकारलेली आहे. याविषयी आपली पहिली पत्नी व नातेवाईकांना माहिती असल्याची कबुलीही मुंडेंनी दिली होती. याविषयी सविस्तर फेसबूक पोस्ट मुंडेंनी लिहिली होती.

हेही वाचा - धनंजय मुंडे प्रकरणी भाजपाची कोलांटी उडी; आता म्हणतात रेणू शर्मावर कारवाई करा

राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपचा बदलला सूर
रेणू शर्माने तक्रार मागे घेतल्यानंतर भाजपच्या गोटातून याबद्दल प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप होणे हे खूपच धक्कादायक होते. त्यामुळे आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली होती. महाराष्ट्रात चूकीच उदाहरण जाऊ नये म्हणून आम्ही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र रेणू शर्माने नंतर तक्रार मागे घेतली. त्यामुळे या संदर्भात चूकीचा आरोप करण्यावरून रेणू शर्मा यांच्या विरोधात कलम 192 नुसार कारवाई कारवाई व्हावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी केलेली आहे.

मुंबई पोलिसांनी कारवाई करावी
चूकीचा आरोप करून चूकीची तक्रार करणे यामुळे एक सामान्य नागरिक किंवा राजकीय व्यक्तीचा आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. अशा प्रकारच्या चूकीच्या तक्रारी दाखल होत असतील, तर खऱ्या पीडित महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन हा कुठेतरी बदलला जातो. आणि हे समाजाच्या हिताचे नाही. त्यामुळे मुंबई पोलिसांनी रेणू शर्मा यांच्या विरोधात खोटी तक्रार देणे तसेच सरकारी यंत्रणेचा वेळ वाया घालवणे या बद्दल कारवाई करावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

हेही वाचा - दिलासा! धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेली बलात्काराची तक्रार मागे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.