ETV Bharat / city

कुठे मूलभूत सुविधांचा अभाव, तर कुठे डॉक्टरच गायब...राज्यभरातील कोविड सेंटर्स 'भगवान भरोसे'? - maharashtra corona news

अलिकडेच कोविड केंद्रांमधील सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पनवेल आणि कोल्हापूर येथे महिला रुग्णांवर अत्याचाराच्या घटना घडल्या. या केंद्रांमध्ये आवश्यक त्या सोयी उपलब्ध केल्याचा दावा करण्यात येतो. मात्र, हे दावे कसे पोकळ आहेत, याची पोलखोल करणारा हा वृत्तांत!

covid centers in maharashtra
कुठे मूलभूत सुविधांचा अभाव, तर कुठे डॉक्टरच गायब...राज्यभरातील कोविड सेंटर्स 'भगवान भरोसे'?
author img

By

Published : Jul 28, 2020, 7:23 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगाला वेठीस धरले आहे. महाराष्ट्रात दररोज 8 हजारांच्या वर बाधित रुग्णांची संख्या समोर येत आहे. या रुग्णांवर उपचारासाठी आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. लक्षणे असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे. तर, लक्षणे नसलेल्या रुग्णांना विविध ठिकाणी तयार करण्यात आलेल्या कोविड केंद्रांमध्ये ठेवण्यात येते. अलिकडेच कोविड केंद्रांमधील सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पनवेल आणि कोल्हापूर येथे महिला रुग्णांवर अत्याचाराच्या घटना घडल्या. या केंद्रांमध्ये आवश्यक त्या सोयी उपलब्ध केल्याचा दावा करण्यात येतो. मात्र, हे दावे कसे पोकळ आहेत, याची पोलखोल करणारा हा वृत्तांत!

कोणाचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला, की रुग्णाची खरी परीक्षाच सुरू होते. लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णाला कोविड सेंटरमध्ये नेण्यात येते. ही सेंटर वरवरुन चांगली वाटतात. परंतु, प्रत्यक्षात अनुभूती वेगळीच येते. कोविड सेंटरमध्ये रुग्णांना मार्गदर्शक तत्वांनुसार काही मुलभूत सुविधा आणि औषधोपचार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. पण, या ठिकाणी त्याचाच अभाव असतो. रुग्णांकडून वारंवार तक्रारी करण्यात येतात. तरीही अनेकदा प्रशासनाकडून हवी तशी गंभीर दखल घेतली जात नाही. कोविड सेंटरची जबाबदारी कंत्राटदारांवर देण्यात येते. त्यांच्याकडून वेळच्या वेळी नाष्टा, जेवण, इत्यादींचा पुरवठा होणे अपेक्षित आहे. पण, प्रत्यक्षात यापैकी काहीही होत नाही. एवढेच काय तर अंघोळीसाठी गरम पाण्याचीही सोय नसते. थंड पाण्याने अंघोळ करावी लागते. गरम पाण्याची उपकरणे केवळ नावापुरतीच असल्याचे चित्र अनेक कोविड सेंटरमध्ये दिसून येते. कोविड सेंटरच्या अशा कारभाराविरोधात रुग्णांना आंदोलने करावी लागली. त्यानंतर काही प्रमाणात चित्र सुधारले.

देहुरोडच्या सेंटरमध्ये सुविधांचा अभाव

पिंपरी-चिंचवड शहरा लगत असलेल्या देहूरोड परिसरात 140 कोरोना बाधित रुग्ण आहेत. बहुतांश रुग्ण हे देहूरोड कंटनमेंट बोर्डाच्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. परंतु, रुग्णांना आवश्यक असलेल्या सुविधा मिळत नसून सेंटर ची दुर्दशा झाल्याचं पाहायला मिळत आहे. रुग्णांनी देखील विविध सुविधा मिळत नसल्याचा आरोप केला आहे. देहूरोड परिसरात 100 खाटांचे कोविड सेंटर असून तेथे ऑक्सिजनची व्यवस्था नाही, दारे तुटलेली, पाण्याचे गिझर बंद (गरम पाणी नाही) कचऱ्याचे ढीग आहेत. काही रुग्णांनी दोन ते तीन दिवस झाले अंघोळ केली नाही. दारे तुटलेली असल्याने थंड वाऱ्याने कोरोना रुग्ण त्रस्त आहेत. देहूरोड ला रुग्णाची संख्या वाढली आहे. सेंटरमध्ये आत्तापर्यंत 150 रुग्ण उपचारासाठी दाखल केले होते, त्यापैकी 60 रुग्ण कोरोनामुक्त झालेत तर सध्या 37 रुग्णांवर या सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. बाकीच्या रूग्णांना त्यांच्या घरी क्वारंटाइन करण्यात आले आहे. देहूरोड कंटेंमेंट बोर्डाच्या अधीक्षक सुनीता जोशी यांनी काही आरोप फेटाळून लावत दार, आणि इतर सुविधा नसल्याचे त्यांनी मान्य केले आहे.

वसईत रुग्णांनी केले आंदोलन

वसई पूर्वे वरून इंडस्ट्री येथे पालिकेने नव्याने उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये डॉक्टर्स, नर्सेस, व सफाई कामगारांची वानवा होती. त्यामुळे रुग्णांचे हाल होत होते. अनेकदा सूचना करूनही रुग्णालय प्रशासन दखल घेत नसल्याने रुग्णांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर काही राजकीय पक्षांनी महापालिकेत आंदोलनेही केली.

कल्याणमध्ये शिक्षिकेने केली पोलखोल

मानपाडा येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षिका असणाऱ्या महिलेने त्यांच्या कुटुंबीयांच्या दुर्दैवाचा पाढाच वाचला. निकृष्ट आणि अपूर्ण जेवण, डॉक्टर आणि इतर स्टाफ गैरहजेरी यामुळे येथील सर्व नागरिक प्रचंड त्रस्त झाल्याचे त्या म्हणाल्या. या विलगिकरण कक्षात घरासारख्या सुविधा देवू नका, पण किमान आवश्यक असलेल्या गोष्टी द्याव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत. या विलगीकरण कक्षात कोणत्याही प्रकारे स्वच्छता राखली जात नाही. अन्न निकृष्ठ दर्जाचे असते. मात्र तरीही हॉटेलपेक्षा जास्त बिल कंत्रादाराकडून घेतले जात आहे.

डॉक्टर सुद्धा पाहायला येत नाहीत

या विलगिकरण कक्षात डॉक्टर रुग्णांना पाहण्यासाठी येत नाहीत, असा आरोप नागरिक करत आहेत. दुसरीकडे खासगी रुग्णालयात लाखो रूपयांची बिले दिली जात आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांनी करायचे काय, सरकार आमच्याकडे लक्ष देईल का, हा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

यवतमाळ येथे जेवणात आढळली गोम

वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहातही एक कोविड कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षातील कोविड रुग्णांच्या जेवणात गोम अळी निघाल्याने खळबळ उडाली होती. रुग्णांनी निकृष्ट दर्जाचा आहार व जेवणात निघालेल्या गोम अळीचा फोटो आणि व्हिडिओ काढून व्हायरल केले होते.

मीरा भाईंदरच्या सेंटरमध्ये रुग्णांचे हाल

मीरा भायंदर येथे नुकतेच बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतीमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. या ठिकाणी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांनी तक्रारीचा पाढाच वाचला होता. दुपार होऊन गेली तरीही जेवण मिळत नाही, नाष्टादेखील अतिशय अल्प प्रमाणात दिला जातो, गरम पाणी नाही, अशा तक्रारी करण्यात आल्या होत्या. दरम्यानच्या काळात महापालिका आयुक्त बदलले. त्यांनी जातीने लक्षा घातल्यानंतर कंत्राटदार बदलला. त्यानंतर येथील परिस्थिती सुधारली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.