मुंबई - राज्याच्या मुख्य सचिव पदावरून सीताराम कुंटे हे सेवा निवृत्त झाल्यानंतर त्यांनी काल मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रधान सल्लागार पदाचा पदभार स्वीकारला ( Sitaram Kunte took over as Principal Adviser ). मंगळवारी सल्लागार पदी नियुक्ती केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती.
हेही वाचा - Kalpita Pimple - फेरीवाल्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सहाय्यक आयुक्त पिंपळे पुन्हा सेवेत रुजू, म्हणाल्या..
सेवा निवृत्त मुख्य सचिव कुंटे यांचा प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने कुंटे यांनी मंत्रालयात पदभार स्वीकारला. मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच, मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीताराम कुंटेना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळावी, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोंदीकडे केली होती. २२ नोव्हेंबरला तसा प्रस्ताव पाठवला होता. कुंटेना मुदतवाढ मिळेल, असे काहीसे चित्र होते. मात्र, केंद्राने सीताराम कुंटे यांना मुदतवाढ न देता, देबाशीष चक्रवर्तींची राज्याच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती केली.
राज्य सरकारला धक्का
मुख्य सचिवपदी असलेले सीताराम कुंटे ( Sitaram Kunte ) यांच्यानंतर वंदना कृष्णा या १९८५ च्या बॅचच्या सनदी अधिकारी सेवा ज्येष्ठतेनुसार प्रशासनात अग्रेसर आहेत. तर, दुसऱ्या स्थानावर देबाशीष चक्रवर्ती होते. ते देखील १९८६ च्या बॅचचे अधिकारी आहेत. दोघांचाही कार्यकाळ फेब्रुवारी २०२२ मध्ये संपुष्टात येणार आहे. त्यामुळे, कुंटे यांचा कार्यकाळ वाढवून मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, केंद्राने मुदतवाढ नाकारून चक्रवर्ती यांना पदभार सोपवत राज्य सरकारला जोरदार धक्का दिला.
हेही वाचा - महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा कालावधीत कोविड नियमांचे काटेकोर पालन करा - मंत्री आदित्य ठाकरे