ETV Bharat / city

ड्रग्ज प्रकरणी आज एसआयटी करणार आर्यन खानची चौकशी

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला नवं वळण मिळालं असून याप्रकरणी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर लावण्यात आलेल्या वसुलीच्या आरोपांचीही चौकशी सुरु आहे. NCB च्या विजिलंस टीमनं कथित वसुली प्रकरणात दावा करण्यात आलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. ड्रग्ज पार्टीचं ज्या क्रूझवर आयोजन करण्यात आलं होतं.

आर्यन खान
आर्यन खान
author img

By

Published : Nov 9, 2021, 10:32 AM IST

मुंबई - क्रूझ ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आज एनसीबी समोर आपला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याची शक्यता आहे. दिल्लीतील एसआयटीमार्फत पुन्हा या प्रकरणाचा तपास सुनील सिंग यांच्या मार्फत करण्यात येत आहे. प्रभाकर साईल यांनी लावलेल्या आरोपानंतर ही SIT गठित करण्यात आले होते. या एसआयटीमार्फत आर्यन खानला हजर राहण्याचे समन्स देण्यात आला आहे. त्यामुळे आज आर्यन खान मुंबई NCB कार्यालयात हजर राहण्याची शक्यता आहे.

एनसीबीने रविवारी आर्यन खानला चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. परंतु प्रकृतीची सबब देत आर्यन खान चौकशीसाठी अनुपस्थित राहिला होता. तसेच प्रकृती ठिक झाल्यानंतर चौकशीसाठी हजर राहणार असल्याचं आर्यनच्या वकिलांनी एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. दरम्यान, एनसीबीनं आर्यन खानची यापूर्वीही चौकशी केली आहे. परंतु, मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाची चौकशी आता एनसीबीचं SIT पथक करत आहे. त्यामुळे एसआयटी पथक या प्रकरणातील सर्व आरोपींचे पुन्हा नव्यानं जबाब नोंदवत आहे. सोमवारी अरबाज मर्चंट आणि अचित कुमार यांची चौकशी करण्यात आली होती.

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला नवं वळण मिळालं असून याप्रकरणी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर लावण्यात आलेल्या वसुलीच्या आरोपांचीही चौकशी सुरु आहे. NCB च्या विजिलंस टीमनं कथित वसुली प्रकरणात दावा करण्यात आलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. ड्रग्ज पार्टीचं ज्या क्रूझवर आयोजन करण्यात आलं होतं, त्या क्रूझवर जाऊनही पथकानं पाहणी केली. NCB च्या विजिलंस पथकानं काल या प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांचीही तब्बल 7 तास चौकशी केली. त्यांना आज पुन्हा चौकशीला बोलवण्यात आले आहेत.

प्रभाकर साईलचे आरोप काय -

आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. केपी गोसावी आणि सॅम डिसूझाचं मी फोनवरील संभाषण ऐकलं होतं. 25 कोटींचा बॉम्ब टाका. 18 कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ असं या दोघांमध्ये संभाषण झाल्याचं साईल यांचा दावा आहे. आपण के.पी गोसावी यांचे बॉडीगार्ड असल्याचा दावाही साईल यांनी केला आहे. त्यानंतर गोसावीने मला फोन केला आणि पंच म्हणून राहण्यास सांगितलं. एनसीबीने 10 कोऱ्या कागदांवर माझी सही घेतली. तसेच मी गोसावींना 50 लाखांच्या दोन बॅगाही दिल्या होत्या, असंही प्रभाकर साईलनी सांगितलं. 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजून 45 मिनिटाने गोसावीने मला फोन केला होता. तसेच 2 ऑक्टोबर रोजी 7.30 वाजेपर्यंत तयार राहण्यास मला सांगण्यात आलं. गोसावींनी मला काही फोटोही पाठवले होते. फोटोत जे लोक दिसत आहेत त्यांचे हे फोटो मला दाखवण्यात आले होते. ग्रीन गेटवर याच लोकांची ओळख पटवण्यास सांगितल्याची धक्कादायक माहितीही साईल यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.