मुंबई - अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या अंत्ययात्रेत ब्रह्मकुमारी विधींचा समावेश असणार आहे. सिद्धार्थ हा ब्रम्हकुमारी अनुयायी होता. अभिनेत्याच्या शेवटच्या अंत्ययात्रेबद्दल ब्रह्मकुमारी येथील तपस्विनी म्हणाल्या, सिद्धार्थला सकाळी 11 वाजता कूपर हॉस्पिटलमधून घरी नेण्यात आले. त्याठिकाणी प्रथम ध्यान करून इतर विधी करण्यात आले. कूपर रुग्णालयातून अंत्ययात्रा निघाली असून ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार विधी पार पडणार आहे.
हेही वाचा- सिध्दार्थच्या निधनाने शहनाझ गीलवर कोसळला दुःखाचा डोंगर
सिद्धार्थची आई देखील एक ब्रह्मकुमारी अनुयायी आहे. सिद्धार्थचं जाणं हा आईसाठी मोठा धक्का आहे. पण आमचा अभ्यास आणि शिकवणी लोकांना मजबूत राहण्यास मदत करतात, असे त्या तपस्विनी म्हणाल्या..
हेही वाचा- वाचा.... सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूपूर्वीचा घटनाक्रम