मुंबई - सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून तपास केला जात असताना बिहार पोलिसांना मिळालेल्या रिया चक्रवर्ती हिच्या विरोधातील तक्रारी नंतर या संदर्भात बिहार पोलीस सुद्धा तपास करत आहे. मात्र सुशांत सिंह राजपूत याचा मित्र सिद्धार्थ पिठानी याने मुंबई पोलिसांना ई-मेल करून त्याच्यावर रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात जवाब देण्याचा दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला आहे. मुंबई पोलिसांना केलेला हा मेल ई टीव्ही भारतच्या हाती लागला आहे.
सिद्धार्थ याने केलेल्या मेलमध्ये लिहिले आहे, की रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात पोलिसांना स्टेटमेंट देण्यासाठी सुशांतचे वडील ओपी सिंह, मितु सिंह व या अन्य एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन येत असल्याचा आरोप केला आहे. 27 जुलै रोजी ओपी सिंह यांनी आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप सिद्धार्थ याने केला आहे.
या बरोबरच सुशांत सिंह याच्या नोकराचा बिहार पोलिसांनी जवाब नोंदवला असून त्याच्या म्हणण्यानुसार 13 जून रोजी सुशांतच्या घरी कुठलीही पार्टी झाली नव्हती. 14 जून रोजी सुशांत कुठेही बाहेर गेलेला नव्हता. 13 जून रोजी सुशांतने रात्री 2 वाजता 2 कॉल केले होते. रिया चक्रवर्ती व महेश शेट्टी या दोघांना संपर्क साधण्याचा प्रयत्न सुशांतने केला होता मात्र हा फोन कॉल उचलला गेला नव्हता.