ETV Bharat / city

शारीरिक व्याधींमुळे घराबाहेर पडू न शकणाऱ्या नागरिकांचे होणार लसीकरण, मुंबई मनपाचा निर्णय

जे नागरिक आजारपणासह शारीरिक, वैद्यकीय कारणांनी अंथरूणास खिळून आहेत, अशा व्यक्तींचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याची सुरुवात उद्या अंधेरी पूर्व येथील के/पूर्व प्रभागापासून प्रायोगिक तत्त्वावर केली जात आहे. त्यासाठी प्रोजेक्ट मुंबई या बिगर शासकीय सेवाभावी संस्थेचे देखील सहकार्य लाभणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

लसीकरणाचा प्रतिकात्मक फोटो
लसीकरणाचा प्रतिकात्मक फोटो
author img

By

Published : Jul 29, 2021, 5:48 PM IST

मुंबई - मुंबईतील जे नागरिक आजारपणासह शारीरिक, वैद्यकीय कारणांनी अंथरूणास खिळून आहेत, अशा व्यक्तींचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याची सुरुवात उद्या अंधेरी पूर्व येथील के/पूर्व प्रभागापासून प्रायोगिक तत्त्वावर केली जात आहे. त्यासाठी प्रोजेक्ट मुंबई या बिगर शासकीय सेवाभावी संस्थेचेही सहकार्य लाभणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

सकारात्मक निर्णय

कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगाने आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी केंद्र व राज्य सरकारसह बृहन्मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील आहे. वय किंवा इतर कारणांनी शारीरिक हालचालींवर मर्यादा येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह इन लसीकरणासारखे उपक्रमही महानगरपालिकेने राबवले आहेत. असे, असले तरी, आजारपणासह शारीरिक, वैद्यकीय कारणांनी अंथरूणास खिळून आहेत, अशा नागरिकांना लसीकरण केंद्रांवर येणे शक्य होत नाही. त्यांची अडचण लक्षात घेता, अशा व्यक्तींना त्यांच्या घरीच जावून, लस देण्यासंदर्भात मागणी करण्यात येत होती. महाराष्ट्र राज्य शासनाने देखील संपूर्ण राज्यात स्थानिक प्राधिकरणांना या संदर्भात नागरिकांकडून माहिती संकलीत करुन कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यात ४ हजार ४६६ व्यक्तींची नोंद

ज्यांच्या घरात अंथरुणास खिळून असणारे (bedridden) व्यक्ती आहेत, ज्यांना अशा व्यक्तीचे कोविड लसीकरण करुन घ्यावयाचे आहे, अशा व्यक्तींची नावे, वय, पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणास खिळून असण्याचे कारण इत्यादी माहिती covidvacc2bedridden@gmail.com या ईमेल आयडीवर मागविण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा विचार करता, आतापर्यंत ४ हजार ४६६ व्यक्तींची नावे प्राप्त झाली आहेत.

६ महिने अंथरुणास खिळून

अंथरुणास खिळलेल्या व्यक्तींचे लसीकरण करण्यासंदर्भात राज्य शासनाने काही प्राथमिक मार्गदर्शक तत्त्वे देखील निश्चित केली आहेत. ज्यांचे लसीकरण करायचे आहे, अशी व्यक्ती पुढील किमान ६ महिने अंथरुणास खिळून राहणार असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासह लस घेण्यासाठी अशा व्यक्तींचे संमतीपत्र संबंधित व्यक्ती, नातेवाईक यांनी प्रशासनाला सादर करणे आवश्यक असेल. तसेच, अशा व्यक्तींना कोवॅक्सिन ही लस देण्याचे निर्देश तज्ज्ञांच्या समितीने दिले असून, त्यानुसार कोवॅक्सिन ही लस देण्यात येईल. तज्ज्ञ व्यक्तींच्या उपस्थितीत लसीकरण करुन त्याबाबत आवश्यक ती सर्व प्रक्रिया पाळण्यात येणार आहे.

प्रायोगिक तत्त्वावरील लसीकरण

हे लसीकरण सुरु झाल्यानंतर, कोण-कोणत्या बाबी समाविष्ट कराव्या लागतील, याचा विचार करुन पुढील टप्पा हाती घेण्यात येणार आहे. यामध्ये सामाजिक संस्थांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. दरम्यान, अंथरुणास खिळलेल्या व्यक्तिंचे लसीकरण करण्याची कार्यवाही सुलभरीतीने पार पाडता यावी, यासाठी आवश्यकता असल्यास बिगरशासकीय, सेवाभावी संस्थांचे सहकार्य घेण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. त्यानुसार, प्रोजेक्ट मुंबई या बिगर शासकीय संस्थेच्या सहकार्याने लसीकरणाची कार्यवाही करणार आहे, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.