मुंबई - शिवसेना विरुद्ध शिंद गटाचा वाद संध्या सर्वोच्च ( Supreme court hearing on Shivsena matter ) न्यायालयात आहे. शिंदे गटातील 16 आमदरांच्या अपात्रतेचा मुद्दा आणि सरकारची ( Shivsena court case status ) वैधता या मुद्द्यांवर होणारी ही सुनावणी आज 8 ऑगस्ट रोजी होणार होती. मात्र, ही सुनावणी पढे ढकलण्यात आली असून ती आता 12 तारखेला होण्याची ( Shivsena and Supreme court ) शक्यता आहे. त्यामुळे, आता शिंदे आणि ठाकरे यांच्यातील लढाईवर काय निकाल लागतो हे आता 12 तारखेलाच कळेल.
हेही वाचा - Heavy Rain in Mumbai at Night : मुंबईत रात्री मुसळधार पाऊस; मुंबईत पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी
शिवसेना पक्षातील अंतर्गत वादाचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. सलग दोन दिवसांनंतर सोमवारी पुन्हा सुनावणी होणार होती. या सुनावणीला आता तारीख पे तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे, सोमवारी ८ ऑगस्टला होणारी सुनावणी बुधवारी १२ ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ३ ऑगस्टची सुनावणी ४ ऑगस्टला झाली होती.
धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय घेऊ नका, असे आदेश - एकनाथ शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेच्या ( Shivsena news ) मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. हे सरकार बेकादेशीर पणे स्थापन झाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. तर आपणच शिवसेना असून, आम्ही शिवसेना सोडली नसल्याचा दावा शिंदे गटाकड़ून करण्यात येत आहे. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान युक्तिवादही झाले. ४ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाने देखील आपली बाजू मांडली. दरम्यान, शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत सध्या कुठलाही निर्णय घेऊ नका, असे निर्देश सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी निवडणूक आयोगाला दिले होते. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होत आहे.
सुनावणीची संभाव्य तारीख १२ ऑगस्ट - महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी, म्हणजेच ८ ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवली होती. त्यामुळे, राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागले होते. मात्र, अचानक सोमवारची सुनावणी पुढे ढकलली असून, संभाव्य तारीख १२ ऑगस्ट देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर संभाव्य तारीख नमूद केली आहे. सुनावणी लांबणीवर गेल्याने आता या प्रकरणात आता खंडपीठ नेमणार की १२ ऑगस्टला सरन्यायाधीश निर्णय देणार याबाबत सांशकता आहे.
हेही वाचा - Maharashtra Weather today : मुंबईत पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा