मुंबई - आरेमधील मेट्रो कार शेडच्या संदर्भातील मुद्दा अजूनही शांत झालेला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने आरे कारशेडच्या संदर्भातील सर्व विरोधी याचिका रद्द केल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा आरेमध्ये जवळपास तीनशे झाडे तोडण्यात आली. यावर प्रचंड गदारोळ होऊन घटनास्थळी अनेकजण आंदोलनात सामील झाले होते. सुरुवातीला आरे कारशेडला विरोध करणारी शिवसेना मात्र, कुठेतरी बॅकफूटवर येऊन या मुद्द्यावर हात वर करत असल्याचे चित्र पाहायला मिळते.
हेही वाचा -राष्ट्रवादीला आणखी धक्का, माजी खासदार संजय पाटील शिवसेनेत
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आरे संदर्भातील प्रश्न विचारला असता त्यांनी या संदर्भात बोलणे टाळले आहे. आरे संदर्भात होणारी वृक्षतोड याबद्दल मी वेगळी पत्रकार परिषद घेईन, कारण आरे हा स्वतंत्र विषय आहे. माझे सरकार आल्यानंतर आरेमधील वृक्षांच्या खुनींना मी पाहून घेईन, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - राधाकृष्ण विखे-पाटलांची उमेदवारी अडचणीत; अर्जावर काँग्रेस उमेदवाराचा आक्षेप