ETV Bharat / city

Maharashtra Political Crisis : शिवसेनेच्या बंडखोर गटाची 'या' कारणासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव - शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

16 आमदारांना अपात्र आणि गटनेता कारवाईसाठी पाठवलेल्या नोटीसीविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली ( shivsena rebel mla group filed petition in supreme court ) आहे.

eknath shinde supreme court
eknath shinde supreme court
author img

By

Published : Jun 26, 2022, 7:46 PM IST

Updated : Jun 26, 2022, 8:44 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात सुरू असलेला सत्ता संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोचला आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या गटाने सर्वोच्च न्यायलायात धाव घेतली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी 16 आमदारांना अपात्र आणि गटनेता कारवाईसाठी पाठवलेल्या नोटीसीविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर सोमवारी ( 27 जून ) सुनावणी होण्याची शक्यता ( shivsena rebel mla group filed petition in supreme court ) आहे.

  • Rebel Shiv Sena MLA Eknath Shinde approaches Supreme Court against the disqualification notices issued by the Dy Speaker against rebel Maharashtra MLAs. Plea also challenges the appointment of Ajay Chaudhary as the Shiv Sena's legislative leader in the House in place of Shinde. pic.twitter.com/KOBBj6RSiJ

    — ANI (@ANI) June 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शिवसेनेने विधिमंडळाच्या गटनेतेपदी अजय चौधरी यांची नियुक्ती केली आहे. तसेच, नरहरी झिरवळ यांनी बंडखोर 16 आमदारांना नोटीस बजावली आहे. त्यांना 48 तासांच उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याची मुदत सोमवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत असेल. या दोन मुद्यांविरोधात शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत शिंदे गटाकडून तीन मुद्दे दाखल करण्यात आले आहे. तसेच, शिंदे गटाकडून उपाध्यक्ष यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याकरिता तयारी सुरू झाली आहे. या संदर्भातील पत्र देखील विधानसभा सचिवांना पाठवण्यात आले आहे.

शिंदे गटाच्या याचिकेतील मुद्दे -

  • अजय चौधरी यांच्या नियुक्तीला आव्हान
  • बंडखोर 16 आमदारांना अपात्र ठरवण्याला विरोध
  • शिंदे गटाच्या आमदारांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी

हेही वाचा - Kamat On Rebel MLAs Suspension : शिवसेनेचे बंडखोर आमदार अपात्र होणारच, सेनेचे वकील कामतांचा दावा

Last Updated : Jun 26, 2022, 8:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.