ETV Bharat / city

Shiv Sena Press : PMC बँक घोटाळ्याप्रकरणी किरीट आणि निल सोमैयांना अटक करा; संजय राऊत कडाडले - शिवसेनेची पत्रकार परिषद सुरू

shivsena bhavan
शिवसेना भवन
author img

By

Published : Feb 15, 2022, 3:33 PM IST

Updated : Feb 15, 2022, 5:01 PM IST

16:44 February 15

PMC बँक घोटाळ्याप्रकरणी किरीट आणि निल सोमैयांना अटक करा; संजय राऊत कडाडले

मी पळपुटा नाही, मी माझ्या मित्रांना टाळणार नाही. माझ्या मित्रांना मुद्दाम फ्रेम केले. पीएमसी बँक घोटाळ्याचा सोमय्यांकडून पुन्हा पुन्हा उल्लेख होत आहे. राकेश वाधवानशी आमचे संबंध असल्याचे सांगितले, राकेश वाधवानच्या खात्यातून भाजपच्या खात्यात वीस कोटी गेले, पक्ष निधीच्या नावावर. या घोटाळ्यात सोमैया यांचा हात आहे. त्यामुळे किरीट सोमैया यांना अटक करण्याची मागणी राऊत यांनी केली.

16:40 February 15

माझी बँक खाती असलेल्या कार्यालयात ईडीचे लोक गेले : संजय राऊत

माझी बँक खाती असलेल्या कार्यालयात ईडीचे लोक गेले असे संजय राऊत म्हणाले. तसेच किरीट सोमैया यांचा उल्लेख राऊत यांनी मुलुंडचा दलाल असा केला आहे. तसेच पाटणकरांनी जमीन कशी घेतली, हे सोमैया यांनी दाखवावे. 10 लोकांनी विकल्यानंतर पाटणकरांनी ती जमीन विकत घेतली, असा आरोप संजय राऊत यांनी सोमैयांवर केला.

16:35 February 15

मी कपडे शिवतो तेथीही ईडीने चौकशी केली - राऊत

मी कपडे शिवतो तिथेही ईडी गेली होती. पवारांच्या कुटुंबियांची घरी देखील तपास यंत्रणांनी धाडी टाकल्या. आम्ही ईडी कार्यालयाबाहेर पत्रकार परिषद घेणार होते. पण ती लवकर घेणार आहोत. आमची एक गुंठा जमीन काढून दाखवा. ईडीकडे काही काम नाहीत का? ईडीचे आमच्यासोबत पंगा घेतलाय, अशी टीका राऊत यांनी भाजपवर केली.

16:34 February 15

16:29 February 15

मराठी भाषेला विरोध करणारे सोमैया भाजपचा फ्रंटमॅन; संजय राऊतांची भाजपवर कडाडून टीका

पाटणकरांनी देवस्थानाची जमीन कुठे घेतली हे सोमैया यांनी दाखवावं. बाराव्या माणसाकडून पाटणकरांनी जमीन घेतली. राऊतांनी पूर्ण यादी वाचली. पाटणकर आणि देवस्थानाचा काही संबंध नाही. आम्ही देवस्थानाकडून जमिनी खरेदी केल्या नाहीत.

16:26 February 15

संजय राऊत यांचे भाजपवर गंभीर आरोप

खासदार संजय राऊत म्हणाले की, "केंद्रीय तपास यंत्राणांचा वापर करून महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही काही लोकांनी आम्हाला मदत केली नाही तर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा तुमच्या मागे लावू. आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली लढलो, नुसते हल्लेच नाहीत तर अतिरेक्यांचे हल्ले आम्ही परतवले आहेत ते याच वास्तूच्या खाली."

16:21 February 15

राज्य सरकार पाडण्यासाठी मदत करा; राऊत यांचा भाजपवर आरोप

महाराष्ट्रातलं सरकार त्यांना पाडायचं आहे

सरेंडर व्हा अन्यथा, सरकार पाडू अशा धमक्या भाजप देत आहे

बहुमत असताना भाजप कुणाच्या भरोशावर तारखा देत आहे?

उपराष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे, ते सर्व त्या पत्रात आहे

माझ्यासारख्या लोकांना त्रास दिला जातोय

16:17 February 15

सरकार पाडायला मदत करा, नाहीतर तपास यंत्रणा मागे लावू; संजय राऊतांचा भाजपवर आरोप

16:00 February 15

संजय राऊत सेना भवनात दाखल होताच शिवसैनिकांचा जल्लोष

संजय राऊत यांची पत्रकार परिषद

मुंबई - संजय राऊत सेना भवनात दाखल होताच शिवसैनिकांचा जल्लोष केला. थोड्याच वेळात शिवसेनेची पत्रकार परिषद सुरू होणार आहे.

15:38 February 15

'झुकेंगे नही' शिवसेना भवनाबाहेर बॅनरबाजी; पत्रकार परिषदेसाठी LED स्क्रीनची व्यवस्था

मुंबई - 'बहोत बरदाश किया आता बस' असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut ) यांनी आज (15 फेब्रुवारी) 4 वाजता पत्रकार परिषद (Shivsena Press Conference) घेऊन मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे जाहीर केले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांनी बॅनरबाजी केल्याचे (Banner near Shivsena Bhavan) पाहायला मिळाले. शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाकडून वाघाचा फोटो असलेले 'झुकेंगे नही' अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे.

पोलीस बंदोबस्तात वाढ -

शिवसेना भवनाबाहेर नेहमीच पोलिसांची सुरक्षा असते. मात्र, आज होणाऱया या पत्रकार परिषदेसाठी प्रमुख नेते व शिवसेनेचे आमदार, खासदार येणार आहेत. त्यामुळे शिवसेना भवनाबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव शिवसेना भवनात येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जात आहे. येथे मुंबई पोलिसांच्या श्वान पथकातील एक श्वानसुद्धा आणण्यात आला आहे.

रस्त्यावर LED स्क्रीन-

संपूर्ण महाराष्ट्राने आमची आजची पत्रकार परिषद पाहावी असे आवाहन संजय राऊत यांनी केले होते. त्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना भवनाबाहेर मोठी एलईडी स्क्रीन लावण्यात आलेली आहे. यावर आजच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष -

दरम्यान, आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत व इतर नेते नेमके काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे ही पत्रकार परिषद पाहण्यासाठी शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.

15:03 February 15

शिवसेना कोणता 'बॉम्ब' फोडणार? थोड्याच वेळात पत्रकार परिषद

मुंबई - शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे 'साडे तीन' नेते तुरुंगात जाणार असल्याचा दावा केल्यानंतर ते नेते कोण, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडीवर आरोप करणाऱ्या नेत्यांचा यामध्ये समावेश असण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना नेते संजय राऊत नेमका कोणता गौप्यस्फोट करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Last Updated : Feb 15, 2022, 5:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.