मुंबई : एकनाथ शिंदे सोबत असलेल्या बंडखोर आमदारांच्या घराची सुरक्षा (MLA's house Security ) महाराष्ट्र पोलिसांकडून (Maharashtra Police) काढण्यात आली असल्याचा आरोप बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. मात्र, मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) कोणत्याही आमदाराची किंवा त्यांच्या घराची सुरक्षा काढण्यात आली नसल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse-Patil) यांनी स्पष्ट केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी परत यावे, यासाठी शिवसेनेकडून आधी आवाहन करण्यात येत होतं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी देखील आमदारांनी परतण्यासाठी 24 तासाचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, त्यानंतरही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदार (MLA) परत न आल्याने मुख्यमंत्र्यांनी देखील कारवाईचा इशारा दिला. त्यानंतर कालपासूनच शिवसैनिक आक्रमक झाले. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, पंढरपूर येथे आमदारांच्या कार्यालयावर शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली आहे.
मुंबईतून तोडफोडीला सुरुवात -
बंडखोर आमदारांपैकी मुंबईतील मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर आणि दिलीप लांडे यांच्या कार्यालयावर काल 24 जून रोजी शिवसैनिकांनी तोडफोड केली. त्यानंतर आज पुण्यातही शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात येत आहे. त्यानंतर बंडखोर आमदारांकडून यांच्या घरावरची सुरक्षा काढण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला होता.
हेही वाचा - शिवसैनिक आक्रमक, पुण्यात राडा, संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर राज्यभर वणवा भडकणार