ETV Bharat / city

'सरकारमध्ये सर्व काही आलबेल' कोणतेही मतभेद नसल्याचा एकनाथ शिंदेंचा निर्वाळा

author img

By

Published : Jan 27, 2020, 7:56 PM IST

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात चांगले काम करत आहे. या सरकारमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचा निर्वाळा मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

eknath shinde
एकनाथ शिंदे

मुंबई - सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीमध्ये उठलेले वादळ थांबलेले दिसत आहे. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी, राज्यातील सरकार किमान समान कार्यक्रमावर काम करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाच चांगले काम सुरू असून तिन्ही पक्षांमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

अशोक चव्हाण यांच्या विधानावर मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... शिवसेनेवर विश्वास नाही, इतकी लाचारी कशी...

अशोक चव्हाण यांनी नांदेड येथील एका कार्यक्रमात बोलताना, सरकार स्थापन करण्यापूर्वी शिवसेनेकडून घटनाबाह्य काम करणार नाही, असे लिखीत स्वरूपात घेतल्याचे विधान केले होते. यावरून बराच वादंग निर्माण झाला होता. अखेर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर पडदा टाकत, सर्व काही ठिक आणि सुरळीत चालु असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा... 'हिंदूहृदयसम्राट' नावाचे फलक काढण्याचे राज ठाकरेंचे आदेश; अवघ्या ५ मिनिटात आटोपली बैठक

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, गरिबांना परवडणऱ्या दरात शिवशाही थाळी, असे अनेक विषय मार्गी लावले आहेत. दिलेल्या प्रत्येक आश्वासनांची पूर्ती सरकारकडून केली जात आहे. हे सर्व महाविकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग आहे. त्यामुळे सरकार त्या धोरणानुसारच कामकाज करत आहे, असे शिंदे यांनी म्हटले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार चांगले काम करत आहे आणि या सरकारमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचा निर्वाळा एकनाथ शिंदेंनी यावेळी दिला.

Intro:Body:mh_mum_ashok_chavan_eknath_shinde_mumbai_7204684
Eknath shinde byte with live 3G
सरकारमध्ये कुठलेही मतभेद नाही :
मंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्वाळा
मुंबई: मंत्री अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यावरून पहा विकास आघाडी मध्ये उफाळलेला वादच शमण्याची चिन्हे असून शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार किमान समान कार्यक्रमावर सुरू असून तिन्ही पक्षांमध्ये कुठेही मजबद नसल्याचा निर्वाळा दिला आहे.
मंत्री अशोक चव्हाण यांनी घटनाबाह्य काम करणार नाही असे शिवसेनेकडून लिहून घेत असल्याचे वक्तव्य केले होते.
एकनाथ शिंदे मिळाले महा विकास आघाडी सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांची कर्ज मुक्ती शिवशाही थाळी असे अनेक विषय मार्गी लावून आश्वासनांची पूर्ती केली जात आहे. हा विकास आघाडी सरकार हा किमान समान कार्यक्रमाचा भाग आहे त्यामुळे त्यानुसारच सरकारचे कामकाज सुरू आहे. सरकारमध्ये कुठलेही मतभेद नाही असे त्यांनी शेवटी सांगितले.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.