ETV Bharat / city

Shivsena Leader Sudhir Joshi : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे वृद्धापकाळाने निधन - शिवसेना नेते सुधीर जोशी यांचा परिचय

मुंबई - शिवसेना नेते सुधीर जोशी यांचे ( Senior Shivsena leader Sudhir Joshi death ) वृद्धापकाळाने निधन झाले. जोशी हे बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे समर्थक होते. त्यांची शिवसेना पक्ष संघटनेत महत्वाची भूमिका राहिली आहे.

शिवसेना नेते सुधीर जोशी
शिवसेना नेते सुधीर जोशी
author img

By

Published : Feb 17, 2022, 5:27 PM IST

Updated : Feb 17, 2022, 6:41 PM IST

मुंबई - दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी तथा शिवसेना नेते सुधीर जोशी ( Shivsena leader Sudhir Joshi death ) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात पक्षबांधणीसाठी जोशी ( Balasaheb Supporters death in Mumbai ) यांचे मोठे योगदान मानले जाते.

सुधीर जोशी यांना कोविड १९ संसर्गाची बाधा झाली होती. त्यांच्यावर मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. नुकतेच कोरोनाच्या आजारातून घरी परतले होते. मात्र आज त्यांचे निधन झाले. जोशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते, असे मानले जाते. कॅबिनेट मंत्री पदासह शिवसेनेचे मुंबईचे दुसरे महापौर म्हणून जोशी यांचे नाव घेतले जाते.
हेही वाचा-Minister Nawab Malik : आज मंत्री नवाब मलिक हजर होणार चांदीवाल आयोगासमोर

सुधीर जोशी यांचा परिचय ( Shivsena leader Sudhir Joshi biography )
'संस्कृत व सुशिक्षित कार्यकर्त्यांचे मोहोळ लाभलेला' आणि लोभस व्यक्तिमत्त्व असलेला शिवसेना नेता म्हणजे सुधीर जोशी अशी त्यांची ओळख होती. मुंबईचे माजी महापौर तरुण व तडफदार सुधीर जोशी यांच्याकडे सुशिक्षित कार्यकर्त्यांची फौज असलेल्या स्थानीय लोकाधिकार समितीची धुरा बाळासाहेबांनी सोपविली होती. बाळासाहेबांनी त्यांच्यावरील टाकलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरविला. बाळासाहेबांच्या सहकारी नेत्यांतील एक विश्वासू सहकारी नेता म्हणून ते बाळासाहेबांचे जवळचे सहकारी राहिले आहेत.
हेही वाचा-ISIS threatens Yasin Bhatkal : जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील वकिलाला इसिसची धमकी

निर्णय ठरले लोकाभिमुख-
सुधीर जोशी हे १९६८ साली प्रथम नगरसेवक झाले. मुंबई महानगरपालिका गटनेता, विरोधी पक्षनेता म्हणून ते राहिले. १९७३ मध्ये मुंबई महानगरपालिकेचे महापौर झाले तेव्हा ते सर्वांत तरुण महापौर होते. १९६८ पासून ते विधान परिषद सदस्य होते. १९९२-९३ या दरम्यान ते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते होते. तेव्हा त्यांनी राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पाची पाहणी करून त्यासंदर्भात अहवाल निष्कर्ष पुस्तिकेद्वारे सरकारकडे सादर केला. शिवशाही सरकारात ते जून १९९५ ते मे १९९६ या कालखंडात प्रथम महसूल मंत्री होते. नंतर १९९६ ते १९९९ पर्यंत शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत होते. मंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय लोकाभिमुख ठरले आहेत.

हेही वाचा-Sanjay Raut : सोमैया यांची लोक धिंड काढतील; फडणवीस, अमित शाहांच्या नावे उकळले कोट्यवधी रुपये', संजय राऊतांचा आरोप

स्थानीय लोकाधिकार समिती म्हणजेच सुधीर जोशी ( Sudhir Joshi work for Shivsena party )
स्वतःच्या नेतृत्वाचे उसने अवसान न आणता त्यांनी लोकाधिकार चळवळीला बळ दिले. या चळवळीने जे बळ धरले व यश प्राप्त केले त्यात सुधीर जोशींचा सिंहाचा वाटा आहे. संगीत, क्रिकेट व समाजसेवा यांचा त्रिवेणी संगम सुधीरभाऊंच्या जीवनात पाहायला मिळतो. ते त्यांच्या 'आपुलकी' या मोठ्या गुणामुळे गुणीजनांत आणि समाजात अतिशय आपलेसे झाले आहेत. त्यामुळेच स्थानीय लोकाधिकार समिती म्हणजेच सुधीर जोशी हे समीकरण पक्के झाले, वृद्धिंगत झाले. सुधीर जोशींनी जे सामाजिक आणि राजकीय पद भूषविले त्याला न्याय दिला आहे. त्यांनी भूषवलेली काही पदे अशी आहेत.

  • अध्यक्ष- शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष
  • अध्यक्ष / विश्वस्त - साने गुरुजी विद्यालय, दादर सार्वजनिक वाचनालय. कार्यकारी समिती सदस्य - गरवारे क्लब. सल्लागार-जसलोक रुग्णालय कर्मचारी संघटना. विश्वस्त-जाणीव प्रतिष्ठान. विश्वस्त-शिवाई सेवा ट्रस्ट.
  • अध्यक्ष- बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सेना.
  • अध्यक्ष - इंडियन ओव्हरसीज बँक कर्मचारी सेना.
  • अध्यक्ष - कॅनरा बँक कर्मचारी सेना
  • अध्यक्ष- महाराष्ट्र दूध वितरक सेना.
  • अध्यक्ष- विमा कर्मचारी सेना

शिवसेनेला नावारूपाला आणण्यात सुधीर जोशींचा मोठा हात-

सुधीर जोशी हे लोकाधिकार समितीचे प्रमुख होते. आजही ही समिती शिवसेनेची ताकद आहे. शिवसेनेला नावारूपाला आणण्यात त्यांचा मोठा हात आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी सुधीर जोशी यांच्या आठवणींना उजाळा दिला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

सुधीर जोशी उत्तम संघटक, अभ्यासू नेते - राज्यपाल

माजी मंत्री आणि मुंबईचे माजी महापौर सुधीर जोशी उत्तम संघटक तसेच अभ्यासू व लढवय्ये नेते होते. त्यांच्या निधनाबद्दल दुःख होत, असल्याची शोक भावना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केली. कामगार तसेच स्थानिकांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. मुंबईचे महापौर, विधान परिषद सदस्य, विरोधी पक्षनेते व राज्याचे मंत्री या नात्याने त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या शोकसंवेदना त्यांचे कुटुंबिय व चाहत्यांना कळवितो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.

Last Updated : Feb 17, 2022, 6:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.