ETV Bharat / city

'शरद पवार समजून घ्यायला भाजपला 100 जन्म घ्यावे लागतील'

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असलेले शरद पवार यांना समजून घेण्यासाठी भाजपला शंभर जन्म घ्यावे लागतील.. पवारांचा अनुभव दांडगा आहे, तसेच राज्यात शिवसेनाच सरकार स्थापन करेल, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला..

संजय राऊत
author img

By

Published : Nov 19, 2019, 10:58 AM IST

मुंबई - शरद पवार यांनी राज्यातील सरकार स्थापनेबाबत केलेले विधान काही चुकीचे नाही. राज्यातील क्रमांक 1 आणि 2 चे पक्ष म्हणून आम्हालाच सत्ता स्थापनेचा विचार करायला पाहिजे, तो विचार आम्ही करत आहोत. शरद पवार यांचा अनुभव मोठा आहे, ते पाहता भाजपवाल्यांना पवारांना समजून घ्यायला 100 जन्म घ्यावे लागतील, असे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

हेही वाचा... आठवलेंनी सुचवला नवा फॉर्म्युला; भाजपला मान्य असल्यास शिवसेनाही तयार

राज्याच्या निवडणुकांचे निकाल लागून आता बराच कालावधी उलटला आहे. तरी अद्याप राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. कोणताही पक्ष सरकार स्थापन न करू शकल्याने अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. एकीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सत्तास्थापनेसाठी पुढाकार घेतला असला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या वक्तव्यांमुळे सत्तास्थापनेचा पेच अद्यापही सुटल्याचे दिसत नाही. रविवारी देखील शरद पवार यांच्या विधानाने संभ्रम निर्माण झाला होता. मात्र अशातच संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन, शिवसेनाच राज्यात सरकार स्थापन करेल आणि स्थिर सरकार देईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

हेही वाचा... शरद पवार- सोनिया गांधी यांची बैठक संपन्न; काय ठरले याबाबत उत्सुकता

शरद पवार समजायला भाजपला 100 जन्म घ्यावे लागतील

सत्ता स्थापनेबाबत शिवसेना आणि भाजपला विचारा, असे सोमवारी शरद पवार दिल्ली येथे म्हणाले होते. यावरून राऊत यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना शरद पवार हे काहीही चुकीचे बोलले नसल्याचा निर्वाळा राऊत यांनी दिला. काही दिवसांपूर्वी भाजपच्या मुंबईतल्या नेत्यांनी मला सांगितले होते, की नरेंद्र मोदी यांना समजून घ्यायला मला २५ जन्म लागतील. यावर पलटवार म्हणून राऊत यांनी भाजपवाल्यांना शरद पवारांना समजून घ्यायला १०० जन्म लागतील, असे म्हटले आहे.

राज्यात लवकरच शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईल - राऊत

राज्यात लवकरच स्थिर सरकार स्थापन होईल आणि तेही शिवसेनेच्याच नेतृत्वात होईल, असा विश्वास राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात शरद पवार माझे गुरू. मात्र पवारांची खरी लढाई ही भाजपशी आहे. तरीही पंतप्रधानांच्या वक्तव्यांवरून भाजपाने काहीतरी शिकावे असा सल्लाही राऊत यांनी यावेळी दिला.

हेही वाचा... पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रवादीवर स्तुतीसुमने..

Intro:Body:

-  संजय राऊत 

- गोंधळ मिडीयाच्या मनात 

- स्थिर सरकार येऊ नये असे ज्यांना वाटत आहे त्यांनी गोंधळ निर्माण केलाय 

- महाराष्ट्रात लवकरच स्थिर सरकार येणार, आम्ही निश्तिं आहेत 

- मोठं राज्य तीन पक्ष एकत्र येत आहेत त्यामुळे वेळ लागणार 

- या आधीही सरकार स्थापन करण्यासाठी वेळ लागला आहे 

- महाराष्ट्रात गोंधळ नाही 

- स्थिर सरकार येणार हे निश्चित, त्या बाबत उद्धव ठाकरे सांगतील 

- भाजपच्या मुंबईतल्या नेत्यांनी सांगितलं २५ वर्ष समजून घ्यावे लागतील मोदीं राऊत 

- पवारांना समजून घ्यायला भाजपवाल्यांना १०० वर्षे लागतील 

- पवारांची लढाई भाजप विरोधात 

- विंडो नावाचा प्रकार राजकारणात नसतो, मागच्या दरवाजाने जाणार नाही 

- भाजपच्या लोकांनी लोकसभा आणि राज्यसभेच्या जागा बदलल्या विरोधात टाकले आहे ते त्यांनी केलं 

- सामनाच्या आग्रलेखातून सत्य मांडले 

-महाराष्ट्रात भाजपला उभे करण्याचे काम शिवसेनेने आणि बाळासाहेबांनी केले 

- लोकसभेत युती करायची नव्हती, अमित शहा आले म्हणून युती केली. युती केली नसती तर वेगळे चित्र

- ही अंताची सुरूवात आहे. सेने सारखा मोठा पक्ष त्यांचा मित्र भाजपने गमावला, त्याची किंमत भाजपला मोजावी लागेल 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.