मुंबई - राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, मात्र मंदिरे उघडण्यासाठी राज्यातील भाजप आंदोलने करत आहे. यावर, नियमावली केंद्राने पाठवली आहे. जर भाजप नेत्यांवर कारवाई केली तर हे आम्हाला हिंदुत्वविरोधी ठरवतील. आता अमित शाहांच्या गृहखात्याने नियमावली जारी केली आहे, त्यांनाही तुम्ही हिंदुत्वविरोधी ठरवणार का? असा उलट सवाल राऊत यांनी भाजपला विचारला आहे.
भाजपचे लोक ईडी कार्यालयात बसले आहेत का ?
ईडीचे समन्स, सीबीआयच्या कारवाया याला राजकीय रंग आहे.
भारतीय जनता पक्षाचे लोक शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांच्या नेत्यांची यादी सोशल मीडियावर जाहीर करत आहेत. भाजपचे प्रमुख लोकांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या १० लोकांची यादी जाहीर केली, भाजपचे लोक ईडीच्या कार्यालयात बसले आहेत की, ईडीचे लोक भाजप कार्यालयात, हे शोधण्याची गरज आहे, असे राऊत म्हणाले.
लावा रडार आमच्यावर
आम्हाला फक्त डिफेन्सच रडारची माहिती आहे. ईडी आणि सीबीआयच्या रडारवर आम्ही असेल तर ते आम्हाला देशाचे दुष्मन मानतात का? लावा रडार आमच्यावर, असे आव्हानही राऊत यांनी केले.
कडक कारवाई होणार
ठाण्यात फेरीवाल्याने जे केले ते दुर्दैवी आहे, त्यावर कडक कारवाई राज्य सरकार करत आहे. सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला आहे, अशी माहितीही राऊत यांनी दिली.
हेही वाचा - जनआशीर्वाद यात्रा, मारामारी चालते; फक्त सणांमधूनच कोरोना पसरतो का? - राज ठाकरे