ETV Bharat / city

राणांच्या दाऊद संबंधांवरही सोमैया यांनी बोलावे - माजी महापौर किशोरी पेडणेकर - माजी महापौर किशोरी पेडणेकर

भाभा रुग्णालयाला खोटे ठरवले जात आहे. रुग्णालय, पोलीस आणि मीडियालाही खोटे ठरवले जात आहे. नक्की खरे कोण हे प्रश्न उपस्थित झाले आहे. किरीट सोमैया यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यात सोमैया जखमी झाले होते. मात्र, ती जखम नव्हती पण दाखवली जात होती. रुग्णालयाने त्या रक्ताचे नमुने घेऊन त्याची तपासणी करायला हवी होती. ०.१ ला जखम किंवा खरचटले, असे म्हटले जाते नाही. ती सुपरफिशल जखम होती. त्याचा गाजावाजा झाला, असे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

माजी महापौर किशोरी पेडणेकर
माजी महापौर किशोरी पेडणेकर
author img

By

Published : Apr 27, 2022, 5:30 PM IST

मुंबई - खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) व आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांचे दाऊदशी संबंध असल्याचे समोर आले आहे. राणा यांना पोलीस ठाण्यात भेटायला गेलेल्या किरीट सोमैया ( BJP Leader Kirit Somaiya ) यांनी याचेही उत्तर द्यावे, असे आवाहन मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर ( Shivsena Leader Kishori Pednekar ) यांनी केले आहे. तसेच सोमैया यांची जखम सुपरफिशल असली तरी गाजावाजा केला जात असल्याचा आरोप माजी महापौरांनी केला आहे.

बोलताना माजी महापौर पेडणेकर

नक्की खरे कोण हे प्रश्नचिन्ह - भाभा रुग्णालयाला खोटे ठरवले जात आहे. रुग्णालय, पोलीस आणि मीडियालाही खोटे ठरवले जात आहे. नक्की खरे कोण हे प्रश्न उपस्थित झाले आहे. जखम नव्हती पण ती दाखवली जात होती. रुग्णालयाने त्या रक्ताचे नमुने घेऊन त्याची तपासणी करायला हवी होती. ०.१ ला जखम किंवा खरचटले, असे म्हटले जाते नाही. ती सुपरफिशल जखम होती. त्याचा गाजावाजा झाला, असे पेडणेकर यांनी म्हटले आहे.

सोमैयांनी त्याचेही उत्तर द्यावे - सोमैया हे मुंबई आणि राज्यात चांगले काम करत आहेत हे दाखवत आहेत. त्यांना राणा दाम्पत्यांचा पुळका आला आहे. मग त्यांनी न सांगता जायला हवे होते. दाऊद गॅंगशी राणा यांचे संबंध स्पष्ट होत आहे. हे आम्ही म्हणत नाही कागदपत्रातून समोर आले आहे. त्याचेही सोमैयांनी उत्तर द्यायला पाहिजे, अशी मागणी पेडणेकर यांनी केली. हा हाय व्होल्टेज ड्रामा निवडणुकीपर्यंत चालू राहणार आहे. मुख्यमंत्री आणि मतोश्रीवर निशाणा साधला की जगभर प्रसिद्धी मिळते. याचा अनुभव येत आहे. विदेशात गेलेल्या नागरिकांना हा हाय व्होल्टेज ड्रामा बघून त्रास होतो, असे पेडणेकर म्हणाल्या.

हेही वाचा - नवनीत राणांच्या अडचणीत वाढ; आता लकडावाला कर्ज प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.