ETV Bharat / city

अर्धांगवायू रुग्णांवर तात्काळ व मोफत उपचार करा, शिवसेना नगरसेवकाची मागणी - paralyzed

एखाद्या व्यक्तीला अर्धांग वायूचा झटका (paralyzed patient) आल्यास त्याला आयुष्यभर अपंग होऊन आपले जीवन जगावे लागते. अशा रुग्णांना वेळीच उपचार मिळल्यास ते बरे होण्याची शक्यता असते तसेच त्यांचे अवयव कायमस्वरूपी अधू होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे अशा लोकांना वेळीच व त्वरित उपचार मिळावेत तसेच खर्चिक असलेले इंजेक्शन पालिकेने मोफत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी महापालिकेकडे (BMC) केली आहे.

BMC
BMC
author img

By

Published : Nov 16, 2021, 8:49 PM IST

मुंबई - एखाद्या व्यक्तीला अर्धांग वायूचा झटका (paralyzed patient) आल्यास त्याला आयुष्यभर अपंग होऊन आपले जीवन जगावे लागते. अशा रुग्णांना वेळीच उपचार मिळल्यास ते बरे होण्याची शक्यता असते तसेच त्यांचे अवयव कायमस्वरूपी अधू होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे अशा लोकांना वेळीच व त्वरित उपचार मिळावेत तसेच खर्चिक असलेले इंजेक्शन पालिकेने मोफत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ (Shivsena) यांनी महापालिकेकडे (BMC) केली आहे.

तातडीने उपाचाराची गरज -

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेक जणांना तणावात काम करावे लागते. अशा परिस्थितीत तणावामुळे हाय ब्लड प्रेशर (उच्च रक्तदाब), हायपरटेंशन यासारखे आजार होतात. अशा आजारांमुळे संबंधितांना अर्धांगवायूचा झटका येऊ शकतो. असा अर्धांगवायूचा झटका आल्यास त्या रुग्णाला तातडीने म्हणजे अवघ्या साडेचार तासांत रुग्णालयीन उपचार मिळाल्यास तर त्या व्यक्तीचे अवयव कायमस्वरूपी अधू होण्यापासून वाचवता येऊ शकतात आणि ती व्यक्ती पूर्णपणे बरे होऊन पूर्वीसारखीच कार्यतत्पर होण्यास, सुदृढ होण्यास मदत होते.

महागडे इंजेक्शन मोफत द्या -

मात्र, अनेकदा आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्तींना अर्धांगवायूचा झटका आल्यास त्याला नजीकच्या रुग्णालयात तातडीने व मोफत उपचार त्वरित मिळण्यात नेहमीच अडचण येत असते. ही गंभीर बाब ओळळून आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्तींना अर्धांगवायूचा झटका आल्यास त्यांच्या शरीराचे अवयव अधू होण्यापूर्वीच त्यांना पालिकेच्या रुग्णालयात तातडीने व मोफत उपचार देण्यात यावेत. अशा रुग्णांना अर्धांगवायूचा झटका आल्यास लागलीच तब्बल 50 हजार रुपये किमतीचे 'आरटीपीए' हे इंजेक्शन देणे फार गरजेचे असते. ते त्यांना पालिका रुग्णालयात आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने तातडीने व मोफत देण्यात यावेत, अशी मागणी सचिन पडवळ यांनी केली आहे.

रुग्णांना मिळणार दिलासा -

आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांवर त्वरित उपचार व्हावेत, त्यांना त्वरित महागडे इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे यासाठी नगरसेवक पडवळ यांनी पालिका सभागृहात ठरावाची सूचना मांडली आहे. येत्या सभागृहात ही ठरावाची सूचना पालिका सभागृहाने मंजूर केल्यास तसेच पालिका आयुक्तांनी त्यावर सकारात्मक अभिप्राय दिल्यास आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

हे ही वाचा - Corona Update : राज्यात आढळले 886 नवे रुग्ण, 34 रुग्णांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.