ETV Bharat / city

जाणून घ्या, नारायण राणे संदर्भात आज दिवसभरात नेमके काय घडले - narayan ranes remark on uddhav thackeray

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयीच्या विधानाचे पडसाद राज्यात उमटत आहेत. या विधानावरून आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी राज्यभरात भाजपच्या कार्यालयावर हल्ला केल्याच्या घटना समोर आल्या आहे. काही ठिकाणी भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांत धक्काबुक्की झाल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे राणेंच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजपत थेट "सामना" रंगल्याचे चित्र राज्यात बघायला मिळत आहे.

राणेंच्या निमित्ताने शिवसेना-भाजपत थेट "सामना"

author img

By

Published : Aug 24, 2021, 5:48 PM IST

Updated : Aug 24, 2021, 6:24 PM IST

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मंगळवारी दुपारी रत्नागिरीत अटक करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी केलेले आक्षेपार्ह वक्तव्य राणेंच्या चांगलेच अंगलट आल्याचे चित्र यातून दिसत आहे. रत्नागिरी पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली असून राणेंची तब्यत बिघडल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी आलेल्या डॉक्टरांच्या पथकाने राणेंची तब्यत ठीक नसल्याचे म्हटले आहे. राणेंच्या अटकेचा भारतीय जनता पक्षाकडून विरोध होत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून राणेंविरोधात राज्यभरात आंदोलन होत आहे. राणे विरुद्ध शिवसेना असे चित्र सध्या राज्यात निर्माण झाले आहे.

काय म्हणाले होते राणे
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) जनआशीर्वाद यात्रे दरम्यान रायगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. 'मी असतो तर कानाखालीच चढवली असती.' असे पत्रकार परिषदेत राणे म्हणाले होते. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही त्यांच्यासोबत होते. केंद्रीय मंत्रीपद स्वीकारल्यानंतर कोकणात आलेल्या राणेंनी रायगड येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवण्याचा केलेला प्रयत्न त्यांच्या अंगलट आला आहे. त्यांच्या या वक्तव्याविरोधात नाशिकमध्ये शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार नाशिक पोलिसांनी राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. नाशिक पोलिसांच्या कारवाईनंतर रत्नागिरी पोलिसांनी राणेंच्या अटकेची कारवाई केली आहे.

पोलिसांनी कायद्यानुसार कारवाई करावी - जठार
केंद्रीय मंत्री राणे यांना ताब्यात घेण्यासाठी रत्नागिरी पोलीस गेले होते. पोलीस अधीक्षक स्वतः राणेंशी चर्चा करत होते. यावेळी जनआशीर्वाद यात्रेचे प्रमुख प्रमोद जठार माध्यमांसमोर आले आणि पोलिसांनी कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी केली. पोलिसांकडे अटक वॉरंट असेल तर त्यांनी ते दाखवले पाहिजे, असे जठार म्हणाले. रत्नागिरी पोलिसांनी राणेंना ताब्यात घेतले आणि राणेंना त्यांच्याच गाडीतून संगमेश्वर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. राणेंना पोलीस घेऊन जात असताना राणे समर्थकांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यापुढे राणे समर्थकांचा विरोध चालला नाही.

नाशिक पोलिसांच्या विनंतीवरुन रत्नागिरी पोलिसांची कारवाई
रत्नागिरी पोलीस राणेंना घेऊन संगमेश्वर पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत. नाशिक पोलिसांच्या विनंतीवरुन ही कारवाई झाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी रत्नागिरीच्या पोलिस अधीक्षकांना फोन करुन विनंती केली. कायद्याच्या तरतुदीनुसार राणे यांना अटक करुन त्यांचा ताबा नाशिक पोलिसांकडे द्यावा. त्यानंतर, रत्नागिरी किंवा नाशिकच्या न्यायालयात त्यांना हजर केले जाईल अशी माहिती पोलीस आयुक्त दीपक पांडेय यानी दिली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात शिवसेना विरुद्ध भाजप कार्यकर्ते भिडलेले दिसत आहेत. राज्यात ठिकठिकाणी भाजप कार्यालयांवर शिवसैनिकांनी हल्ला चढवला. मुंबईतील राणे यांच्या जुहू येथील निवासस्थानी शिवसैनिकांनी आंदोलन केले. तिथे राणेंचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला. त्यानंतर राज्यभरात राणेंच्या वक्तव्याचा निषेध करत शिवसैनिकांकडून आंदोलन करण्यात आले आहे.

अटकेचे शिवसेनेकडून समर्थन तर भाजपकडून विरोध
केंद्रीय मंत्री झाल्यानंतर प्रथमच महाराष्ट्रात आल्यानंतर राणेंना अटकेच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राणेंच्या वक्तव्याचे समर्थन केलेले नाही मात्र राणे यांच्यावर विविध ठिकाणी गुन्हे दाखल करुन त्यांच्या अटकेच्या कारवाईचा निषेध केला आहे. मुंबईत माध्यमांसोबत बोलत असताना फडणवीस यांनी म्हटले आहे, की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन भारतीय जनता पक्षात करत नाही, मात्र मंत्री आणि व्यक्ती म्हणून भारतीय जनता पक्ष नारायण राणे यांच्या मागे उभा असल्याचे फडणवीस म्हणाले. फडणवीस यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. मात्र सरकार ज्या पद्धतीने कारवाई करत आहे त्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही. पोलीस राज्य सरकारच्या दबावात येऊन काम करत असल्याचा आरोपही पत्रकार परिषदेतून देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

भाजप कार्यालयावर हल्ला सहन करणार नाही
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर ठिक-ठिकाणी शिवसेनेकडून निदर्शने केली जात आहेत. नाशिकमधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावरही दगडफेक करण्यात आली. मात्र, शिवसैनिकांकडून अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर हल्ला केला जाणार असेल तर तो कदापि सहन केला जाणार नाही. त्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला. तसेच, ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर हल्ला झाला आहे त्या हल्लेखोरांवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी. हल्लेखोरांवर कारवाई झाली नाही तर, त्या ठिकाणच्या पोलीस आयुक्तालयासमोर मी आणि विधान परिषदचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे आंदोलन करतील, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

शरद पवारांचा राणेंबद्दल बोलण्यास नकार
नारायण राणे यांच्यावर नाशिक, पुण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. तसेच रत्नागिरी पोलिसांकडून नारायण राणे यांना अटकही झाली. मात्र या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोजकीच प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांकडून नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत शरद पवार यांना विचारले असता, नारायण राणे यांना महत्त्व देत नसल्याचे ते म्हणाले आहेत. यशवंतराव प्रतिष्ठान येथे शरद पवारांनी नारायण राणेंबाबत ही प्रतिक्रिया दिली आहे.

राणेंना अटक हा लोकशाहीवरील हल्ला - संबित पात्रा
केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे वक्तव्य चुकीचे असेल, मात्र त्यांना झालेली अटक म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केले आहे. महाराष्ट्रात लोकशाहीला महत्त्व दिले जात नसल्याचे पात्रा यांनी म्हटले आहे. शर्जील उस्मानी याच्या विरोधात कुणीही कारवाई करत नाही. खासदार संजय राऊत महिलांविरोधात अनेक विधाने करतात, मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही, असे सांगत पात्रा म्हणाले की, राणेंवर झालेली कारवाई ही सूडाच्या भावनेतून केलेली आहे.

हेही वाचा - नारायण राणेंना अटक करण्यापूर्वी त्या बंद खोलीत काय घडलं, पाहा VIDEO

Last Updated : Aug 24, 2021, 6:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.