मुंबई - राणे कुटुंब गोंधळलेल्या अवस्थेत आहे. एक भाऊ काय बोलतोय दुसऱ्याला पटत नाही. वडील तिसरेच काहीतरी बोलतात, त्याच्यामुळे यांच्यावर जनतेने आता किती विश्वास ठेवावा हा प्रश्न आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी वाटेल तसे बोलणे. कोकणातील जनता त्यांना मत देणार असेल, असे त्यांना वाटत असेल, तर त्यांच्या भ्रमाचा भोपळा येणाऱ्या 21 तारखेला फुटेल, अशी टीका शिवसेना प्रवक्त्या व आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी निलेश राणे यांनी केलेल्या विधानावर केली.
हेही वाचा - विधानसभा निवडणुकीत 9 हजार 673 केंद्रातील मतदानाचे होणार लाइव्ह वेबकास्ट
कोकणात राणे कुटुंबीयांची विश्वासार्हता दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. अनेक ठिकाणी त्यांना हार मानावी लागली आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे उद्धव ठाकरे व शिवसेना यांच्याविषयी वाटेल तसे बोलणे हा एकच मुद्दा असतो, असे कायंदे म्हणाल्या. उद्धव ठाकरेंना काही बोलले की कोकणातील जनता त्यांना मत देणार असे त्यांचा गैरसमज आहे. त्यांच्या या भ्रमाचा भोपळा येणाऱ्या 21 तारखेला फुटेल. उद्धव ठाकरे यांना नाव ठेवण्यात कुठली त्यांची बुद्धिचातुर्य दिसत नसल्याचे त्या म्हणाल्या.
हेही वाचा - 'आम्ही काय बांगड्या भरल्या नाहीत, मलाही जशास-तसे उत्तर देता येते'
एक भाऊ एक बोलतो तर दुसरा काहीतरी वेगळे बोलतो. नारायण राणेची दोन्ही मुले वडिलांचे ऐकतात का? हाच मोठा प्रश्न असल्याचे कायंदे यांनी म्हटले आहे.