ETV Bharat / city

Devendra Fadnavis : भावनिक पळवाट काढू नका.. कायद्याने उत्तर द्या : फडणवीसांचा राऊतांना टोला

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला ( Sanjay Raut Alleged Kirit Somaiya ) आहे. आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्याच्या नावाखाली वर्गणी गोळा करून पैसे हडपल्याचा आरोप ( INS Vikrant Fund Scam ) आहे. त्यावर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली ( Devendra Fadnavis On INS Vikrant Fund Scam ) आहे. ते म्हणाले, राऊतांनी भावनिक मुद्दा उपस्थित करून पळवाट काढू नये. कायद्याने उत्तर द्यावे. त्यांच्या आधीच्या आरोपांमध्येही काहीच सापडले नाही.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस
author img

By

Published : Apr 6, 2022, 3:38 PM IST

मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या ( Sanjay Raut Alleged Kirit Somaiya ) यांच्यावर आयएनएस विक्रांत प्रकरणी भ्रष्टाचाराचा ( INS Vikrant Fund Scam ) आरोप केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी या आरोपाचे खंडन केले ( Devendra Fadnavis On INS Vikrant Fund Scam ) आहे. याविषयी बोलताना त्यांनी सांगितले, या अगोदरसुद्धा किरीट सोमय्या यांच्यावर संजय राऊत यांनी व त्यांच्या आघाडी सरकारने अनेक आरोप केले. परंतु शेवटी त्यातून काही निष्पन्न झाले नाही. ते भाजपा स्थापना दिवसाच्या ( BJP Foundation Day 2022 ) कार्यक्रमानिमित्त मुंबईत बोलत होते.

भावनिक उत्तर नको? : याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संजय राऊत यांनी असे अनेक हास्यास्पद आरोप किरीट सोमय्या यांच्यावर केले आहेत. ते नवनवीन प्रयत्न करत आहेत. ते कुठे कुठे काय काय करणार आहेत हे आम्हाला अगोदरोपासूनच माहीत आहे. किरीट सोमय्या यांच्या मुलाला सुद्धा यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. पण पोलिसही जाणतात अशा पद्धतीचा एफआयआर होऊ शकत नाही. तरीसुद्धा ते वारंवार प्रयत्न करत आहे. परंतु आम्ही त्याला कायद्याने उत्तर देऊ. संजय राऊत यांच्यावर जी काही कारवाई होत आहे त्याला त्यांनी कायद्याने उत्तर द्यावे. भावनिक मुद्दा उपस्थित करून अशा पद्धतीने पळवाट काढणे हे गैर असल्याचे ही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भावनिक होऊन पळवाट काढू नका.. कायद्याने उत्तर द्या : फडणवीसांचा राऊतांना टोला

पत्रावला चाळीचे राजकारण! : काही लोकांचा प्रयत्न असतो की नख कापून स्वतःला शहीद सांगायचे. परंतु अशा पद्धतीचं अनेक प्रयत्न अगोदर झालेले आहेत. आमच्या घरामध्ये घुसून संपूर्ण परिसराचा पंचनामा करून आमच्यावर कारवाई करण्याचं षडयंत्र सुद्धा या सरकारने केलेल आहे. पण त्याला आम्ही घाबरत नाही. पत्रावाला चाळ प्रकरणी मराठी माणसाला हक्काचे घर भेटावं हीच त्यामागची भूमिका होती. मी मुख्यमंत्री असताना याचा पूर्ण पाठपुरावा करून म्हाडाने या इमारती बांधाव्या तसही सांगितलं होतं. परंतु यामध्ये जे स्वतःला मसिहा म्हणून सांगत होते तेच या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार निघाले व त्यांनी भ्रष्टाचार केला. मराठी माणसाच्या नावावर फक्त राजकारण करायचं, त्यांची मतं घ्यायची व त्यांना लाथाडायचं हे काम हे सरकार करत आहे, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.