ETV Bharat / city

strategy for Shiv Sena sign धनुष्य बाण गेल्यानंतर शिंदे गट व ठाकरे गटाची काय आहे रणनिती? 'ही' पक्षचिन्हे निवडू शकतात - ठाकरे गट पक्ष चिन्ह

शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेनेपुढे मोठे संकट उभे ( Thackeray groups selection of party sign ) ठाकले आहे. शिवेसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाने शिवसेना आणि धनुष्यबाणावर दावा केला. त्यामुळे दोघांना कोर्टाची पायरी चढावी लागली. अखेर शिवसेना कोणाची या वादावर तोडगा निघेपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठविले आहे.

एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे
एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे
author img

By

Published : Oct 9, 2022, 9:14 AM IST

मुंबई - शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठल्यानंतर कोणती निशाणी आगामी निवडणुकीत घ्यायची हा पेच निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाच्या १९७ चिन्हांतही वाघ, तलवार आणि ढाल हे चिन्ह वगळले आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोणता चिन्ह घेणार याकडे ( Eknath Shinde party sign selection ) सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे गट गदा किंवा बाळासाहेबांची ओळख असलेली रुद्राक्षमाळ घेण्याची शक्यता आहे. तर शिंदेंना निवडणूक आयोगाने रिक्षा हा पर्याय उपलब्ध करून दिल्याने ते हेच चिन्ह घेऊन रिंगणात उतरण्याची ( Uddhav Thackeray group ) शक्यता आहे. दोन्हीकडून वेगळी रणनीती ठरवली जात आहे.

शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेनेपुढे मोठे संकट उभे ( Thackeray groups selection of party sign ) ठाकले आहे. शिवेसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाने शिवसेना आणि धनुष्यबाणावर दावा केला. त्यामुळे दोघांना कोर्टाची पायरी चढावी लागली. अखेर शिवसेना कोणाची या वादावर तोडगा निघेपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठविले आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक तोंडावर आले असताना निवडणूक आयोगाने केली भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी आहे. मात्र, आगामी निवडणुकीत नवा चिन्ह घेऊन ठाकरे आणि शिंदे यांना रिंगणात उतरावे लागणार आहे.

शिंदेंना चिन्हाचा पर्याय; ठाकरेंचे काय? केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेले धनुष्यबाण गोठवले असून दोन्ही गटाला १९७ चिन्हांचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. यापैकी एका चिन्हाची निवड दोघांनाही करावी लागेल. परंतु ठाकरेंना अपेक्षित असलेले ढाल, तलवार किंवा वाघ अशा प्रकराचे कोणतेही चिन्ह निवडणूक आयोगाच्या यादीत नाहीत. मात्र, शिंदेंना रिक्षा हा पर्याय या उपलब्ध असल्याचे समजते. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोणता चिन्ह वापरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रुद्राक्षमाळ किंवा गदा घेणार केंद्रीय निवडणूक आयोगाच्या चिन्हांच्या यादीतून नव्या चिन्ह ठाकरेंना निवडावे लागणार आहे. मात्र, ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरे यांची ओळख असलेली रुद्राक्षमाळ किंवा गदा हे चिन्ह मागण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाला पर्याय सुचवले जाण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने संमती दर्शवल्यास ठाकरे गदा आणि शिंदे गटाकडून रिक्षा हे चिन्ह घेऊन आगामी निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकतील.

रवी राणा यांच्याकडून पाना चिन्हाची शिंदे गटाला ऑफर निवडणूक आयोगाने शिवसेना या पक्षासह धनुष्यबाण हे चिन्ह गोठविले असताना बडनराचे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट गरज भासल्यास माझा युवस्वाभिमान पक्ष तुम्ही घ्या अशी खास ऑफर दिली आहे. निवडणूक आयोगाने ( Election Commission Of Indian ) तात्पुरते शिवसेनेची निशाणी गोठवली ( Shiv sena Party Sign Dhanushyban ) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.