मुंबई - ईडी आणि राऊत यांच्या वादात आता राम कदम यांनी उडी घेतली आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. यावर राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे." एकीकडे कोणाचे घर तोडण्यासाठी महाराष्ट्र सरकार पोलिसांचा वापर करते आणि एखाद्याला जबरदस्तीने अटक करते, तर दुसरीकडे केंद्रीय एजन्सी नोटीस देत आहे आणि चौकशीत सहकार्य करण्याचे आवाहन करत आहे, तर मग यात सूडबुद्धी कोणती? ही शिवसेनेची दुटप्पी वृत्ती आहे" असे ट्विट राम कदम यांनी केले आहे.
संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. पीएमसी बँक घोटाळ्याच्या चौकशीसंदर्भात ही नोटीस पाठवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वर्षा राऊत यांना 29 डिसेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना देखील ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांना 30 डिसेंबरला ईडीच्या कार्यालयात हजर राहाण्यास सांगण्यात आले आहे.