ETV Bharat / city

Monsoon Session कामकाज समितीच्या बैठकीत शिंदे गटाच्या दोघांचा समावेश, शिवसेनेला मोठा धक्का - Shiv Sena was left out in the executive meeting

शिवसेनेने कामकाज समितीच्या बैठकीत समावेश करावा, यासाठी विधिमंडळाला पत्र दिले होते. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर ( Assembly Speaker Rahul Narvekar ) यांनी हे पत्र नाकारत शिंदे गटाच्या दादा भुसे, उदय सावंत ( Uday Sawant ) या दोघांचा समावेश केला आहे. शिवसेना, बंडखोर शिंदे गटाचा वाद सर्वोच्च न्यायालयात ( Supreme Court ) न्यायप्रविष्ट असताना विधानसभेच्या विधिमंडळ कामकाज समितीतून डावलल्यामुळे शिवसेनेसाठी हा मोठा हादरा मानला जातो आहे.

Monsoon Session
पावसाळी अधिवेशन
author img

By

Published : Aug 10, 2022, 9:14 PM IST

मुंबई येत्या १७ ऑगस्टपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ( Monsoon session ) सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या कामकाज समितीचे बैठक बोलवली होती. शिवसेनेला या समितीतून डावलण्यात आले आहे. शिवसेनेने कामकाज समितीच्या बैठकीत समावेश करावा, यासाठी विधिमंडळाला पत्र दिले होते. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर ( Assembly Speaker Rahul Narvekar ) यांनी हे पत्र नाकारत शिंदे गटाच्या दादा भुसे, उदय सावंत ( Uday Sawant ) या दोघांचा समावेश केला आहे. शिवसेना, बंडखोर शिंदे गटाचा वाद सर्वोच्च न्यायालयात ( Supreme Court ) न्यायप्रविष्ट असताना विधानसभेच्या विधिमंडळ कामकाज समितीतून डावलल्यामुळे शिवसेनेसाठी हा मोठा हादरा मानला जातो आहे.

Monsoon Session
पावसाळी अधिवेशन
एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या बंडाळीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांना पायउतार व्हावे लागले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार ( Maha Vikas Aghadi Govt ) यामुळे कोसळले. शिवसेनेच्या तब्बल ४० आमदार, १२ खासदारांनी बंडखोरी करत शिंदे गटाला पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसेना, धनुष्यबाण चिन्ह कुणाचे हा वाद सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख पे तारीख सुरू आहे. विधिमंडळात शिवसेना अधिकृत पक्ष आहे. त्यामुळे संसदीय कामकाज समितीच्या बैठकीत शिवसेनेला सहभागी करून घ्यावे, अशी मागणी शिवसेनेने केली होती. विधानसभा अध्यक्षांना गटनेते अजय चौधरी यांनी पत्रव्यवहार केला होता. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी चौधरी यांची मागणी फेटाळून लावत शिंदे गटाच्या दादा भुसे आणि उदय सामंत यांची वर्णी लावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना, शिंदे गट असा वाद रंगणार आहे.
हेही वाचा - PM Modi Hits Congress : पंतप्रधानांचा काँग्रेसवर निशाणा म्हणाले, 'काही जण काळ्या जादू कडे वळाले...'

अजय चौधरींचे पत्र - कामकाज सल्लागार समितीवरील सदस्यांच्या नियुक्तीबाबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह सर्व पक्षाच्या गटनेत्यांना विधिमंडळ सचिवांकडून पत्र पाठवले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कोणतेही पत्र दिले नाही. त्यामुळे शिवसेनेचे विधिमंडळातील गटनेते अजय चौधरी विधानसभा अध्यक्षाना पत्र लिहून कामकाज समितीत सहभागी करून घेण्याची मागणी केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना गटनेतेपदी अजय चौधरी आणि सुनील प्रभू यांची शिवसेनेच्या प्रतोदपदी नियुक्ती केली आहे. शिवसेना अधिकृत पक्ष असून आम्हाला बैठकीला बोलवावे, अशी विनंती केली होती.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून - शिंदे आणि फडणवीस सरकारचा महिनाभरापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी पार पडला. शिंदे गटातील ९ आणि भाजपच्या ९ अशा एकूण १८ मंत्र्यांना राज्यपाल कोश्यारी यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यानंतर लगेत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची घोषणा करण्यात आली आहे. १७ ऑगस्ट पासून पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे.

हेही वाचा - CM Eknath Shinde पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 13 हजार 600 रुपये मिळणार, शिंदे सरकारची मोठी घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.