ETV Bharat / city

Shivsena Symbol Dhanushban Hearing : शिवसेना केंद्रीय निवडणुक आयोगावर नाराज? हे आहे कारण.... - शिवसेना उद्धव ठाकरे

केंद्रीय निवडणूक आयोगाकडे कागदपत्र सादर करण्यासाठी शिवसेनेने वेळ मागितला होता. मात्र याआधी शिवसेनेने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जी कागदपत्र सादर करण्यात आली, ती कागदपत्र पुन्हा एकदा निवडणूक आयोगाने मागितले असल्याने शिवसेनेने यावर नाराजी व्यक्त केली (Shiv Sena upset with Central Election Commission) आहे.

Shiv Sena Uddhav Thackeray
शिवसेना केंद्रीय निवडणुक आयोगावर नाराज
author img

By

Published : Oct 8, 2022, 3:01 PM IST

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेला आज दुपारी १ वाजेपर्यंत सर्व कागदपत्रे सादर करण्याचा वेळ दिला (Shivsena Symbol dhanushban Hearing) आहे. या आधी तीन वेळा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे कागदपत्र सादर करण्यासाठी शिवसेनेने वेळ मागितला होता. काल झालेल्या सुनावणीतही शिवसेनेने काही दिवसाचा अधिकचा वेळ केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागितल्यानंतर, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेला तो वेळ दिला नाही.

शिवसेनेची निवडणूक आयोगावर नाराजी - आज दुपारी १ वाजेपर्यंत शिवसेनेने ही सर्व कागदपत्रे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जमा करावीत, असे आदेश देण्यात आले आहेत. मात्र याआधी शिवसेनेने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जी कागदपत्र सादर करण्यात आली, ती कागदपत्र पुन्हा एकदा निवडणूक आयोगाने मागितले असल्याने शिवसेनेने यावर नाराजी व्यक्त केली (Shiv Sena upset with Central Election Commission) आहे. आधी दिलेली कागदपत्र पुन्हा एकदा निवडणूक आयोग मागत असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे.

अधिकाऱ्याला माहिती नसल्यामुळे गफलत - काल केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (central Election Commission) झालेल्या सुनावणी दरम्यान शिवसेनेकडून काही कागदपत्रे जमा करण्यात आलेली आहेत. याबाबत निवडणूक आयोगाने कागदपत्र जमा झाल्याबाबतची रिसिव्ह देखील दिलेली आहे. मात्र कागदपत्र जमा झाल्याबाबत संबंधित अधिकाऱ्याला माहिती नसल्यामुळे कदाचित ही गफलत झाली असेल, असं मत शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी व्यक्त केली. मात्र आम्ही जी कागदपत्र सादर केली आहे. त्याबाबतचा अध्ययन केलं जाईल, अशी अपेक्षा देखील अनिल देसाई यांनी व्यक्त केली आहे.

शिंदे गटाचे निवडणूक आयोगाला पत्र - शिवसेनेचे धनुष्यबाण निशाणी (Shivsena Symbol dhanushban) कोणाला मिळणार ? यासाठीची लढाई एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये सुरू आहे. ही लढाई सुरू असतानाच अंधेरी पूर्व येथील विधानसभेची पोटनिवडणूक लागली असल्याने चिन्ह नेमकं कोणाचं ? याबाबत निवडणूक आयोगाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. यासाठी एकनाथ शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. दोन्ही गटाकडून शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणीवर दावा असल्याने केंद्रीय निवडणूक आयोग आता धनुष्यबाण चिन्हावर निर्णय घेण्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.