मुंबई - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार असलेल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले ( Shiv Sena Support Droupadi Murmu ) आहे. काल झालेल्या खासदारांच्या बैठकीनंतर आता शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रपती पदाची निवडणूक येत्या 18 जुलै रोजी होणार आहे.
शिवसेनेचा द्रौपदी मुर्मूला पाठिंबा - काल शिवसेना खासदारांची बैठक झाली. त्यात कोणीही माझ्यावर दबाव आणला नाही. राष्ट्रपतीपदी कुणाला पाठिंबा द्यायचा हे तुम्ही ठरवा. कुणाला द्यायचा कुणाला नाही हे तुम्ही सांगाल तसं. कारण हा विषय तुमचा आहे. आजही मी भूमिका स्पष्ट करत आहे. मातोश्रीवर गर्दी आहे. इथेही गर्दी आहे. मी पराभूत झालेल्या काही उमेदवारांशी बोललो. जिल्हाप्रमुखांशी चर्चा सुरू आहे. खासदारांशी चर्चा सुरू आहे. शिवसेनेतील आदिवासी समाजात काम करणाऱ्याांनी विनंती केली. एकलव्य संघटनेचे ढवळे त्यांनी मला विनंती केली. निर्मला गावित आणि आमशा पाडवी यांनीही विनंती केली. आदिवासी समाजातील महिलेला राष्ट्रपती होण्याची संधी मिळत आहे. आम्हालाही ओळख मिळेल. त्यांना पाठिंबा दिला तर बरं होईल. त्यांनी प्रेमाचा आग्रह केला. त्यामुळे शिवसेना द्रोपदी मुर्मू यांना आम्ही पाठिंबा जाहीर केला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी ( Shiv Sena will support NDA candidate Draupadi Murmu ) जाहीर केले.
-
Shiv Sena will support Droupadi Murmu for Presidential elections: Shiv Sena chief Uddhav Thackeray pic.twitter.com/Y6LrGWdlVc
— ANI (@ANI) July 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Shiv Sena will support Droupadi Murmu for Presidential elections: Shiv Sena chief Uddhav Thackeray pic.twitter.com/Y6LrGWdlVc
— ANI (@ANI) July 12, 2022Shiv Sena will support Droupadi Murmu for Presidential elections: Shiv Sena chief Uddhav Thackeray pic.twitter.com/Y6LrGWdlVc
— ANI (@ANI) July 12, 2022
...म्हणून मुर्मू यांना पाठिंबा - आताचे राजकारण पाहिले तर मी भाजपच्या उमदेवाराला विरोधच करायला हवा होता. पण नाही. आम्ही यापूर्वी आम्ही प्रणव मुखर्जी आणि प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता. कार्यकर्त्यांनी, आदिवासी नेत्यांनी आग्रह केला, प्रेमाने मागणी केली. त्यामुळे आम्ही द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोणताही दबाव नाही - उद्धव ठाकरे म्हणाले की, "शिवसेनेने अशा विषयावर कधीही राजकारण केलेले नाही. आपण विरोध करायला हवा होता, पण मी इतका लहान मनाचा नाही.” उद्धव ठाकरेंच्या घोषणेपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पूर्ण पाठिंबा देऊ, असे सांगितले. आमचे सर्व आमदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना मतदान करतील.
महाविकास आघाडीची भूमिका महत्त्वाची - अशा स्थितीत उद्धव ठाकरेंच्या या निर्णयानंतर महाविकास आघाडीत अर्थात एमव्हीए आघाडीत फूट पडू शकते कारण शिवसेनेचे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र मुख्यमंत्रीपद गमावलेल्या उद्धव ठाकरेंना पक्षात फूट पडू नये म्हणून खासदारांच्या आग्रहाचे पालन करावे लागले. मात्र एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने एमव्हीएम आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
मातोश्रीवर झाली होती खासदारांची महत्वाची बैठक - 18 जुलै रोजी देशात राष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे. या राष्ट्रपती निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी शिवसेना खासदार करत होते. ठाकरेंवर खासदारांचाही दबाव वाढत आहे. शिवसेनेच्या 19 पैकी 14 खासदारांकडून लोकसभेत स्वतंत्र गटाची मागणी सुरू असल्याची चर्चा आहे. आमदारांपाठोपाठ खासदारांनी बंड केल्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता होती. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मातोश्रीवर सर्व खासदारांची महत्वाची बैठक झाली आहे. शिवसेनेतील डॅमेज रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएला पाठिंबा दिल्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
हे खासदार उपस्थित : उपस्थित खासदारांमधे गजानन कीर्तिकर - उत्तर मुंबई, अरविंद सावंत - मुंबई दक्षिण, विनायक राउत - रत्नागिरी- सिंधुदुर्ग, धैर्यशील माने - हातकणंगले, हेमंत गोडसे - नाशिक, राहुल शेवाळे- दक्षिण मध्य मुंबई, श्रीरंग बारणे - पिंपरी चिंचवड, प्रताप जाधव - बुलढाणा, सदशिव लोखंडे - शिर्डी, ओमराजे निंबाळकर- उस्मानाबाद, राजेंद्र गावित- पालघर,राजन विचारे - ठाणे, ओमराजे निंबाळकर - उस्मानाबाद तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी या खासदारांची बैठकीला हजेरी होती.
हे खासदार गैरहजर: गैरहजर खासदारांमध्ये यवतमाळ-वाशिम - भावना गवळी, परभणी - संजय जाधव, कोल्हापूर - संजय मांडलिक, हिंगोली - हेमंत पाटील, कल्याण-डोंबिवली - श्रीकांत शिंदे, रामटेक - कृपाल तुमाने, दादरा-नगर हवेली - कलाबेन डेलकर यांचा समावेश होता. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शिवसेनेच्या नाराज १० खासदारांची बैठक झाल्याची चर्चा आहे. तुमाने यांनी मात्र अशी बैठक झाल्याचा इन्कार केला होता तसेच मी दिल्लीत नव्हतोच असे म्हणले होते.