ETV Bharat / city

मंत्रीपद तुमच्या बुडाला चिकटले तरी तुम्ही गद्दारच - उद्धव ठाकरे

माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena leaders ) थोड्याच वेळात शिवाजी मौदानात पोहचणार आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना नेते दोन वेगवेगळे दसरा मेळावे घेत आहेत. नेहमीप्रमाणे शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेची दसरा सभा होत आहे. त्याला उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. त्याचवेळी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर दावा करणाऱ्या शिंदे गटाची मेळावा वांद्रे कुर्ला संकुलात होत आहे. यंदा 20 जून रोजी शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठे बंडखोरी झाली.

uddhav thackeray
उद्धव ठाकरे
author img

By

Published : Oct 5, 2022, 6:18 PM IST

Updated : Oct 5, 2022, 10:49 PM IST

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना नेते दोन वेगवेगळे दसरा मेळावे घेत आहेत. नेहमीप्रमाणे शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेची दसरा सभा होत आहे. त्याला उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. त्याचवेळी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर दावा करणाऱ्या शिंदे गटाची मेळावा वांद्रे कुर्ला संकुलात होत आहे. यंदा 20 जून रोजी शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठे बंडखोरी झाली. त्यानंतर गेल्या चार महिन्यांत घडामोडींमध्ये झपाट्याने बदल झाला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले तर शिंदे गट, भाजपने मिळून राज्यात सरकार स्थापन केले. मात्र यानंतर सर्वात मोठ्या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही, तो प्रश्न शिवसेना नेमकी कुणाची?

तुम्ही गद्दारच - उद्धव ठाकरे

शिवाजी पार्कवरील मेळाव्याला कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. सारे मैदान तुडूंब भरले आहे. विशेषतः या कार्यकर्त्यांमध्ये महिलांची संख्या मोठी आहे.काँग्रेसमध्ये दहा वर्षे राहून खासदारकी आणि आमदारकी उपभोगणाऱ्या नारायण राणे यांनी हिंदुत्वावर बोलू नये. किरण पावसकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदारकीचे चॉकलेट घेतले. त्यांनीही हिंदुत्वावर बोलू नये, सुषमा अंधारे यांची टीका. तुमचे हिंदुत्व ईडीच्या कार्यालयात जागृत झालेले आहे. शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका.मुंबई महाराष्ट्रात रहावी वाटत असेल, तर सर्वांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी ठाम उभे राहिले पाहिजे, असे आवाहनही सुभाष देसाई यांनी यावेळी केले.

महाराष्ट्राचे लचके तोडून मुंबईला खिळखिळे बनविण्याचे काम सुरू. फॉक्सकॉन-वेदांता हा हातातोंडाशी आलेला घास गुजरातला गेला. स्वाभिमानी मराठी माणूस हे सहन करणार नाही. सुभाष देसाईंचा इशारा. देवेंद्र फडणवीसांनी मुंबई महापालिकेच्या कारभाराची चौकशी करण्याऐवजी नागपूरची चौकशी करावी. आपली बस योजनेला शंभर कोटी देण्याचा घाट घातल्याचा सुभाष देसाईंचा आरोप. सध्या लोक सरकारमध्ये बसल्याचा आव आणतायत.

मात्र, हे सरकार मराठी भाषेबद्दल उदासीन असल्याचे उच्च न्यायालय म्हणते आहे. मराठीला वर्गाच्या बाहेर ठेवले आहे. एवढी अवहेलना शिंदे सरकारच्या काळात. हे कुडमुडे सरकार काढून टाका.उद्धव ठाकरेंना दगा देणाऱ्यांची किव करावी तेवढी थोडी. उद्धव ठाकरेंनी जगाला हेवा वाटावे असे मुख्यमंत्रीपद सांभाळले. सुभाष देसाई यांची टीका.शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, तर या जनतेची आहे. विरोधी पक्षनेते दानवेंचे एकनाथ शिंदेंना उत्तर.गर्दी करून शिंदे सेनेकडून महाराष्ट्राची दिशाभूल सुरू. शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांचा शिंदे गटावर हल्लाबोल. मुंबई महापालिकेत आमची ताकद दाखवू असा इशारा.

Last Updated : Oct 5, 2022, 10:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.